Download App

Jayant Patil; पवारांनी घरी बसावं असा सल्ला देणारे स्वत:च पवारांना आता भेटायला आले

Jayant Patil On Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या नऊ मंत्री आणि समर्थक आमदारांसह आज पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे. अजित पवार गट शरद पवारांचे मन वळवण्याचा प्रयत्न करत आहे. पण या भेटीचा परिणाम महाविकास आघाडीवर होणार नाही. लोकशाहीमध्ये सर्वांशी संवाद ठेवला पाहिजे, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.

अजित पवार यांनी शरद पवार यांना वय झालंय आता घरी बसावं असा सल्ला दिला होता. आता त्याच अजित पवारांनी शरद पवार यांची भेट घेऊन आशिर्वाद मागितले. शरद पवार यांनी भेट टाळता आली असती का? यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की निवृत्त व्हा असे म्हणणारे आज शरद पवार यांना भेटून आशिर्वाद मागतात. याच बरेच काही आहे.

विरोधी पक्षाची उद्या बंगळुरु येथे बैठक आहे. त्यापूर्वी अजित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली याचा परिणाम महाविकास आघाडीवर होईल का? असा सवाल जयंत पाटील यांना विचारण्यात आला होता. यावर ते म्हणाले की कोण कोणाला भेटले म्हणून दुसरा कोणी कमजोर होतो असे नाही होतं. लोकशाहीत सर्वांना सर्वांशी संवाद साधण्याची मुभा दिली पाहिजे. शेवटी संवादाने काही चांगल्या गोष्टी होऊ शकतात, असे जयंत पाटील यांनी सांगितले.

बंडानंतर पुढे अजितदादांची काय रणनीती? प्रकाश आंबेडकरांनी केलं भाकीत…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाह 9 मंत्री आणि बंडखोर नेत्यांनी काल (16 जुलै) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा अजित पवार यांच्यासह सर्व नेत्यांनी आणि आमदारांनी शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी पक्ष एकसंघ रहावा, यासाठी मंत्री आणि आमदारांनी शरद पवार यांना विनंती केली, असं खासदार प्रफुल्ल पटेल यांनी भेटीनंतर माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं.

Tags

follow us