राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) नेते व माजी मंत्री जितेंद्र आव्हाड ( Jitendra Awhad ) यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटमधून त्यांनी शिंदे गटाला लक्ष्य केले आहे.मी केलेल्या कामाचे माहिती देणारे बोर्ड हे महापालिकेने काढल्याचे त्यांनी ट्विटमध्ये सांगितले आहे.
आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटले की, कळव्याच्या पूर्वेला मी जी आमदार निधीतून कामे केली आहेत, त्या कामांचा उल्लेख असलेला LED Board आमदार निधीतून लावण्यात आला होता. आज सकाळी अचानक 8 वाजता महापालिकेचे अधिकारी मनिष जोशी यांच्या नेतृत्वाखाली त्या बोर्डची मोडतोड करून तो बोर्ड काढण्यात आला. यावर संबंधित अधिकाऱ्यांना विचारले असता, त्यांनी फोन आल्यावर आम्ही नाही म्हणू शकत नाही, असे उत्तर दिले, अशा शब्दात त्यांनी ट्विट केले आहे.
तसेच ते पुढे म्हणाले की, याचा अर्थ फोन कोणाचा आला असेल ते मला समजत. मी केलेली कामे आणि जण जागृतीचे संदेश त्या बोर्ड वर होते, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटेल आहे. पुढे आव्हाड म्हणाले की, आव्हाडांचा अंत करु, आव्हाडांचा शेवट जवळ आला आहे, असे गद्दार सेनेचे प्रवक्ते म्हणाले. देव त्यांना सुबुद्धी देवो, असे नाव न घेता शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्केंना सुनावले आहे.
दरम्यान शिंदे सरकार आल्यापासून आव्हाड व शिंदे गट यांच्यात संघर्ष तीव्र झाला आहे. काही दिवसांपूर्वी एक महिलेने आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा देखील दाखल केला होता. त्यामुळे आगामी काळात हा संघर्ष आणखी तीव्र झालेला पहायला मिळेल.