सुषमा अंधारेंनी तर तानाजी सावंतांची इज्जतच काढली
सातारा : राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Health Minister Tanaji Sawant)यांनी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray)यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यावर शिवसेना ठाकरे गटाच्या (Shivsena Thackeray Group)उपनेत्या सुषमा अंधारे (Sushama Andhare)यांनी साताऱ्याच्या पाटणमध्ये प्रत्युत्तर दिलंय. अंधारे म्हणाल्या की, आरशात बघून स्वगत बोलणाऱ्या लोकांवर आपण फार व्यक्त न झालेलं बरं. कवी केशवसूत (Keshavsut)यांच्या कवितेमधील एक ओळ सांगून सुषमा अंधारे म्हणाल्या की, पृथ्वीचा आकार केवढा, ज्याच्या त्याच्या डोक्याएवढा. त्यामुळं त्यांचं जेवढे डोकं आहे, तेवढं त्यांनी चालवलं आहे. त्यांच्या स्तरावर आम्ही उतरणार नाही, असं म्हणत सुषमा अंधारेंनी तानाजी सावंतांची इज्जतच काढली.
त्यांनी सांगितलं की, आम्हाला एका अत्यंत सुसंस्कृत, संयमी आणि सभ्य नेतृत्वाचे आदेश आहेत. आम्ही आमची पातळी कधीही सोडणार नाही, अशा शब्दात सुषमा अंधारे यांनी तानाजी सावंत यांच्यावर जोरदार टीका केली.
इलाका तुम्हारा, धमाका हमारा असं म्हणत अंधारेंनी शंभुराज देसाईंना डिवचलं
त्या म्हणाल्या, की काही लोक आरशात बघून बोलत असतात. कदाचित आमचे बंधू तानाजी सावंत आरशात बघून बोलत असतील. यावेळी त्यांनी शिंदे गटाच्या आमदारांच्या आरोपांचा चांगलाच समाचार घेतलाय.
यावेळी सुषमा अंधारे यांनी मोदी-शाहांच्या दौऱ्यांवरुनही जोरदार टीका केली. मोदी आणि शाह यांनी सतत मुंबईत येण्यापेक्षा मुंबईतच एखादा टू बीएचकेचा फ्लॅट घेऊन राहावं, असाही टोला यावेळी सुषमा अंधारे यांनी लगावला आहे.