Download App

Udhav Thackeray यांच्या उर्दूतील पोस्टरवरून आव्हाड आणि म्हात्रेंमध्ये ट्विटर वॉर

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आणि शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे यांच्यामध्ये ट्विटर वॉर रंगलं आहे. या दोन्ही नेत्यांनी ऐकमेकांच्या ट्विटर अकाउंटला टॅग करत शेरे बाजी करण्यात येत आहे. उद्धव ठाकरे यांची नाशिकमधील मालेगावमध्ये सभा झाली. या सभेमध्ये उर्दूमध्ये पोस्टर झळकलं. त्यावरून आता राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आणि शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे यांच्यामध्ये ट्विटर वॉर रंगलं आहे.

शीतल म्हात्रे यांनी उद्धव ठाकरे यांच्या सभेमध्ये उर्दूमध्ये झळकलेलं पोस्टर ट्विट केल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मुंब्र्यातील एक उर्दूमधील पोस्टर शेअर केलं. त्यांनी यामध्ये शीतल म्हात्रे यांना ‘ताई तुम्ही यावर बोला.’ असं आव्हान दिलं. त्यानंतर पुन्हा दोन्ही नेत्यांमध्ये या ट्विटचा सिलसिला सुरूच आहे.

नेमकी काय होती या नेत्यांनी केलेली ट्विट…

‘ह्या मातीत छत्रपती शिवाजीमहाराजांनी हिंदवी स्वराज्य घडवल होतं. नक्की महाराष्ट्राच्या याच मातीत जन्मलात ना तुम्ही? *हीच का तुमची हिंदुत्वादी विचारधारा??* #उध्वस्त_ सेना #खांग्रेसची_चमचेगिरी #मालेगाव’ असं ट्विट शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी केलं होत त्यावर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड उत्तर दिलं. आव्हाड म्हणाले की, ‘ह्याच्यावर बोला ताई .. खास तुमच्या माहिती साठी..कारण नंतर दुसऱ्यावर ढकलायची तुमची सवय आहे.’यावेळी शीतल म्हात्रे यांनी उद्धव ठाकरे यांच्या सभेमध्ये उर्दूमध्ये झळकलेलं पोस्टर ट्विट केलं तर आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मुंब्र्यातील एक उर्दूमधील पोस्टर शेअर केलं.

Uddhav Thackeray यांची सडकून टीका… मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्याने लिहिलेले पत्र वाचता येत नाही!

follow us