ठाणे : महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार उलथवून खोके सरकार आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची पाठ सोडायला तयार नाहीत. एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाला (Birth Day) देखील विरोधकांनी निशाणा साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आज राज्यभरात जोरदार सेलिब्रेशन सुरु आहे. काही ठिकाणी शिंदे यांच्या समर्थकांनी वेगवेगळ्या संकल्पनांवर आधारीत केक तयार आले. सामान्य जनतेचे मुख्यमंत्री म्हणून ओळख असणारे एकनाथ शिंदे अनेक ठिकाणच्या सोहळ्यांना आवर्जून उपस्थितही राहत आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवशी आणखी एका केकची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरूय. ते देखील शिंदे यांच्या ठाण्यात. हा केक आहे ५० खोके.. असं लिहिलेला. केक कापण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड ( Jitendra Awhad ) यांनी. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याच्या वाढदिवसासाठी हा विशेष केक तयार करण्यात आला. जितेंद्र आव्हाड यांनी हा केक कापतानाचा व्हिडिओ सोशल मीडियात तुफान चर्चेत आला. केक कापताना जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या बंडखोरांवर अप्रत्यक्ष खोचक टीका करण्यात आला. मी केक नव्हे तर खोक्याचं कटिंग करत आहे. खोक्यामध्ये खूप मोठा धोका आहे आणि त्याच खोक्यात बोका आहे, असा शब्द उच्चार यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी केला. तर केक कापताना काढलेला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान वायरल होत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जागोजागी मोठे होर्डिंग लावण्यात आले. शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या वरळीत आमदार सदा सरवणकर आणि किरण पावसकर यांच्या कडून बॅनर लावण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महेंद्र विनायक नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त जितेंद्र आव्हाड यांनी मुंब्रामध्ये ५० खोके लिहिलेला केक कापला. या वाढदिवसानिमित्त जितेंद्र आव्हाड यांनी मुंब्रामध्ये उपस्थिती दर्शवली होती. यावेळी कार्यकर्त्यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी ५० खोके असा लिहिलेला केक आणला होता. हा केक जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते कापण्याची विनंती यावेळी कार्यकर्त्यांनी केली. सध्या या केकची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे.