Jitendra Awhad : दुस-यासाठी खड्डा खणतो तो…; आव्हाडांनी केंद्र सरकारला फटकारले

काँग्रेस पक्षाचे राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे.  23 मार्च रोजी न्यायालयाने त्यांच्यावर  ‘मोदी आडनाव’वरील केलेल्या टिप्पणीबद्दल गुन्हेगारी मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरवले आहे.  त्यामुळे ते  लोकसभा सदस्य म्हणून अपात्र ठरले आहेत. त्यांच्या या कारवाईनंतर देशभरातील राजकीय वातावरण तापले आहे. या कारवाईनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व आमदार यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. […]

Jitendra Awhad

Jitendra Awhad

काँग्रेस पक्षाचे राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे.  23 मार्च रोजी न्यायालयाने त्यांच्यावर  ‘मोदी आडनाव’वरील केलेल्या टिप्पणीबद्दल गुन्हेगारी मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरवले आहे.  त्यामुळे ते  लोकसभा सदस्य म्हणून अपात्र ठरले आहेत. त्यांच्या या कारवाईनंतर देशभरातील राजकीय वातावरण तापले आहे. या कारवाईनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व आमदार यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत देशभरात कुठेही कोणाची अब्रूनुकसानी केली म्हणून 2 वर्षे सजा कोणालाही सुनावलेली नाही. जास्तीत-जास्त 6 महिने यापेक्षा ही सजा कधिही पुढे गेलेली नाही. पण, राहुल गांधींना मात्र दोन वर्षे सजा सुनावण्यात आली आणि तात्काळ त्यांची खासदारकी देखिल रद्द करण्यात आली. हे सूड भावनेचं राजकारण या देशाला कुठे घेऊन जाईल हे काहीच कळत नाही, असे म्हणत त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय द्वेष भावनेतून, प्रकाश आंबेडकरांची टीका

 

आज राहुल गांधींसाठी खणलेल्या खड्ड्यात ते राहुल गांधींना ढकलू पाहत आहेत. पण, जो दुस-यासाठी खड्डा खणतो तो स्वत:च त्या खड्ड्यात पडतो हा या जगाचा इतिहास आहे. भविष्यात काय ठेवलं आहे हे आता लवकरच कळून येईल, असे आव्हाड पुढे म्हणाले आहेत.

दरम्यान, काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी भारतीय लोकशाही ओम शांती असे म्हणत आम्ही या निर्णयाच्या विरोधात राजकीय आणि कायदेशीर बाबीतून लढा देऊ आमचा आवाज तुम्ही दडवू शकणार नाही. अडानी आणि  मोदी यांच्यातील लिंकविषयी संसदीय चौकशी समितीची आम्ही मागणी करत होतो. आमचा आवाज दडपण्यासाठीच राहुल गांधींवर ही कारवाई करण्यात आली आहे.

Exit mobile version