राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय द्वेष भावनेतून, प्रकाश आंबेडकरांची टीका

Untitled Design   2023 03 24T173158.783

मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना सुरत सत्र न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना कर्नाटक येथील सभेत चोर म्हटल्याबद्दल राहुल यांच्या विरोधात खटला दाखल करण्यात आला होता. मोदी आडनावाचे सारेच चोर असतात. पंतप्रधान मोदी चोर आहेत असे विधान राहुल गांधी यांनी केले होते. त्यांच्या या विधानावरून त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. आता याच प्रकरणावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी जोरदार टीका केली आहे. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय हा द्वेष भावनेतून घेण्यात आला असल्याची टीका आंबेडकर यांनी केली आहे.

नेमकं काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?
राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय हा द्वेष भावनेतून घेण्यात आला आहे. सुरत सत्र न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. तसेच उच्च न्यायालयात अपील करण्याची मुभा राहुल गांधी यांना देण्यात आलेली असून ते अपील करणार आहेत. मात्र असे असताना भाजपच्या सरकारने तातडीने त्यांची खासदारकी रद्द करणे चुकीचे आहे. आम्ही त्याचा निषेध करतो. सरकारने किमान उच्च न्यायालयाय ती ऑर्डर रद्द करते का याची वाट पाहायला हवी होती. उच्च न्यायालयाने ऑर्डर रद्द नसती केली तर सरकारने आपला अधिकार वापरला असता तर योग्य झाले असते. मात्र आता केवळ द्वेष भावना असल्याचे याठिकाणी दिसत आहे.

उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी ‘या’ टिप्स ठरतील फायदेशीर

नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या
मोदी आडनावाचे सर्वजण चोर कसे असतात? असे विधान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कर्नाटकच्या कोलारमध्ये केलं होतं. त्यानंतर राहुल गांधी यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल करण्यात आला होता. यावर सूरतच्या जिल्हा न्यायालयात सुनावणी पार पडली. कोर्टाने राहुल गांधींना दोषी ठरवले व त्यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली. दरम्यान राहुल गांधींनी जामीनासाठी अर्ज केला असून त्यांना जामीनही मंजूर झाला आहे.

Tags

follow us