उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी ‘या’ टिप्स ठरतील फायदेशीर
मुंबई : गुलाबी थंडीचा मौसम गेला असून आता उन्हाळा सुरु झाला आहे. कडाक्याच्या उन्हात शरीराची लाहीलाही होत असते. यातच उन्हामूळे त्वचा देखील काळवंडते. यामुळे या सीझनमध्ये शरीराची काळजी घेण्याची गरज असते. सुर्याची तीव्र सुर्यकिरण त्वचेला हानी पोहचवतात. सुर्यप्रकाश त्वचेची नैसर्गिक चमक दुर करतो. म्हणूनच त्वचेला उन्हापासून वाचवण्यासाठी काही टिप्स आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. त्वचेची नैसर्गिक चमक कायम ठेवण्यासाठी याा गोष्टींची काळजी घ्यावी.
दुपारचे ऊन हानिकारक
उन्हाळ्याच्या दिवसात वेळेनुसार तापमानाचा पारा वाढत चालतो. यातच सकाळी10 ते दुपारी 3 पर्यंतचे ऊन अतिशय तीव्र असल्याने ते अत्यंत घातक ठरु शकते. या तीव्र उन्हामूळे त्वचा काळवंडू शकते व चमकही कमी होऊ शकते. गरज नसेल तर उन्हाच्या काळात बाहेर पडणे टाळा. .
कपडे कोणते घालावे ते जाणुन घ्या
तुम्हाला काही कामासाठी घराबाहेर जावे लागत असेल तर तुमचे कपडे देखील या काळात महत्वाचे आहे. उन्हाळ्यात संपूर्ण शरीर झाकणारे कपडे घाला. शरीराच्या कोणत्याही भागाला ऊन लागणार नाही याची काळजी घ्यावी. शक्यतो या काळात पूर्ण बाह्यांचे शर्ट, कुर्ते, फुल पॅन्ट्स किंवा सलवार अशी वेषभूषा असावी. तसेच उन्हापासून डोळ्याचे संरक्षण व्हावे यासाठी डोळ्यांना गॉगल लावा आणि डोक्यावर स्कार्फ किंवा टोपी घाला.
पाण्याचे सेवन महत्वाचे
उन्हाळ्यात अनेकदा डिहायड्रेशनची समस्या उद्भवते. उन्हापासून वाचण्यासाठी व डिहायड्रेशन होऊ नये यासाठी पुरेसे पाणी प्यावे. दिवसभरात कमीत कमी 7 ते 8 ग्लास पाणी प्यायले पाहिजे. शरीरात पाण्याचा साठा संतुलित राहावा यासाठी जास्तीत जास्त पाण्याचे सेवन करावे. शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्यास त्वचेची चमकही कमी होऊ शकते.
लालू प्रसाद यादव ते जयललिता या दिग्गज नेत्यांना गमवावी लागली होती, आमदारकी व खासदारकी
योग्य आहार आवश्यक
उन्हाळ्यात त्वचा निरोगी ठेवण्यासाठी आहार देखील महत्वाचा असतो. उन्हाळ्यात शरीर हायड्रेट राहील याअनुषंगाने आहार घेणे महत्वाचे असते. त्वचा निरोगी ठेवण्यासाठी विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसात भरपूर फळे आणि भाज्या आणि त्यांचे ज्यूस यांचा आहारात समावेश करावा.