Jitendra Awhad Dr. Met Padmasinh Patil : ठाण्यातील एक आक्रमक नेता अशी ओळख असलेले जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad)हे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू म्हणून ओळखले जातात. मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघाते ते 2009 पासून आमदार आहेत. मात्र, आव्हाड हे शरद पवारांच्या संपर्कात कोणामुळे आले, आव्हाडांमधील निष्ठावांत कार्यक्रता कोणी घडवला? याविषयी आव्हाडांनी आज भरपूर लिहिलं. माझ्यामधील कार्यकर्ता डॉ. पद्मसिंह पाटील (Dr. Padmasinh Patil) यांनी घडवला, त्यांनी कोणत्याही कठीण प्रसंगात ठामपणे उभं राहण्याची शिकवण दिली, असं सांगितलं.
जिंतेंद्र आव्हाड हे आज तुळजापूरच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी डॉ.पद्मसिंह पाटील पाटील यांची भेट घेतली. डॉ.पद्मसिंह पाटील हे हे खासदार आणि माजी जलसंपदा मंत्री देखील राहिलेले आहेत. ते उस्मानाबाद जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसधील मोठे नेते आणि शरद पवाराचे खंद समर्थक होते. मात्र, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीचा घड्याळ सोडून भाजपचं कमळं हाती घेतलं. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी त्यांचा 83 वा वाढदिवस होता. आणि आज आव्हाडांनी पाटील यांची त्यांच्या घरी भेट घेतली. या भेटीविषयी आणि पाटील यांच्याविषयी आव्हाडांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली. आव्हाड लिहितात –
Odisha Train Accident : अपघाताची घटना वेदनादायी; दोषींना माफी नाही
आज तुळजाभवानीच दर्शन घेतल आणि तिथून थेट डॉ.पद्मसिंह पाटील साहेब उस्मानाबादेत आहे, हे समजलं आणि त्यांना भेटण्याच्या ओढीने त्यांच्या घराकडे निघालो. त्यांना भेटायला जात असताना अनेक क्षण माझ्यासमोर तरळत होते. यातील काही क्षण भावनिक होते तर काही खूप काही शिकवणारे. परंतु याच सगळ्या अनुभवांनी डॉक्टर साहेबांनी माझ्यातला कार्यकर्ता घडवला.
माझ्या कारकिर्दीच्या सुरवातीस मी कोण आहे, कुठला आहे,कोणत्या जातीचा आहे हे न बघता..फक्त मोठ्या विश्वासाने आणि मायेने त्यांनी माझ्या पाठीवर हात ठेवला होता. त्या हातांनी मला माझ्या राजकीय कारकीर्दीत मोठा आत्मविश्वास दिला.. आणि कोणत्याही परिस्थितीत ठामपणे उभे राहण्याची शिकवण दिली.
1990 सालच्या काँग्रेस मधील बंडाचा आणि त्यात डॉक्टर साहेबांनी घेतलेल्या भूमिकेचा मी साक्षीदार आहे. त्यांनी ज्या पद्धतीने त्यावेळी किल्ला लढवला होता, ते प्रसंग आठवले तरी अंगावर काटे उभे राहतात. तीच गोष्ट 1993 साली पवार साहेब मुख्यमंत्री होत असताना देखील पुढे मी आणि माझ्यासकट अनेकांनी अनुभवली होती.
आज ते कुठे आहेत, कोणत्या पक्षात आहेत… या गोष्टीशी मला काही घेणेदेणे नाही. त्यांनी मला माझ्या उभरत्या काळात जी साथ दिली, माझ्या पाठीवर जो प्रेमाचा आणि मायेचा हात ठेवला, मला पवार साहेबांच्याकडे ते घेवून गेले.. या सर्वांची उतराई होन कठीण आहे, आणि त्यांच्या या ऋणातून मुक्त व्हायची माझी देखील इच्छा नाही.
त्यांच्याइतके दिलदार, निस्वार्थी माणसे हे आजच्या काळात अत्यंत दुर्मिळ झाले आहेत.
त्याच्यासोबत जगलेले ते अनमोल क्षण परत येणार नाहीत, ही जाणीव त्रासदायक आहे.
डॉ. साहेबांनी मला घडवलं,
माझ्यातला कार्यकर्ता घडवला..!
आज त्यांना भेटलो, वाईट वाटलं..!
मी पाहिलेले, अनुभवलेले डॉक्टर साहेब आता थकलेत.
त्यांनी कधीच थकू नये अस मनापासून वाटत असलं तरी ते आपल्या हातात नाही.
हे फोटो टिपले. मीच आवर्जून काढून घेतले. माझ्यासाठी हा अनमोल ठेवा आहे.