Download App

आव्हाडांचं जशास तसं उत्तर, मुख्यमंत्र्याचे छोटा राजनच्या सहकाऱ्यासोबतचे फोटोच दाखवले…

  • Written By: Last Updated:

Jitendra Awhad on Mansiha kayande :  राज्यात अमली पदार्थ तस्करीचं प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजतंय. ललित पाटील (Lalit Patil) प्रकरणामुळं विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार ताशेरे ओढले. तर ठाकरे गटाकडून मोठं आंदोलनही करण्यात आलं. खासदार सुप्रिया सुळेंनीही राज्य सरकारवर टीका केली होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या शिंदे गटाच्या आमदार मनीषा कायंदे (Manisha Kayande) यांनी खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि राष्ट्रवादीचे नेते-माजी मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यावर खळबळजनक आरोप केले होते. दरम्यान, कायंदे यांनी केलेल्या टीकेला आता आव्हाड यांनी जोरदार पलटवार केला.

मुंब्र्यातील ड्रग्ज माफिया सलमान फाळके सोबतचा फोटो दाखवत कायंदेंनी आव्हाडांवर आरोप केले होते. आव्हाड यांचा संशयित ड्रग्ज तस्करांशी संबंध असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. सलमान फाळकेसोबत फोटो कसा याचा आव्हाडांनी खुलासा करावा, अशी मागणी कायंदेंनी केली होती.

जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीटवर काही फोटो शेअर केले. आव्हाड यांनी लिहिलं की, गृहनिर्माण घोटाळ्यातील जुगारी, घोटाळेबाज आणि छोटा राजनचा जवळचा सहकारी असलेला पराग संघवी याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ५ दिवसांपूर्वी भेट दिली. पराग संघवी यांच्या निवासस्थानी भेट देतानाचे हे फोटो आहेत. डॉ. कायंदे कृपया यावरही आपण बोलावं, असा खोचक टोला आव्हाडांनी लगावला.

कायदेचे आरोप काय?
मनीषा कायंदे यांनी काल पत्रकार परिषद घेऊन जितेंद्र आव्हाड यांच्यावर गंभीर आरोप केले होते. आव्हाडांचा अमली पदार्थ तस्करांशी संबंध असल्याचा दावा कायंदे यांनी केला होता. तसंच विविध संशयित ड्रग्ज तस्करांसोबत असलेले आव्हाडांचे फोटोही त्यांनी माध्यमांना दाखवले. यावेळी त्यांनी सुप्रिया सुळे यांच्यावरही टीका केली.

जितेंद्र आव्हाड आणि सुप्रिया सुळे यांचा ड्रग्ज प्रकरणातील संशयित शानू पठाण आणि सलमान फाळके यांच्याशी संबंध असल्याचे त्या म्हणाल्या होत्या. सुप्रिया सुळे ह्या संसदरत्न आहेत. मगत आरोपींसोबत त्यांचे फोटो कसे असा सवाल कायंदे यांनी उपस्थित केला होता. आव्हाड आणि सुळे यांनी याप्रकरणी उत्तर द्यावं, अशी मागणीही त्यांनी केली. तसचं २०२० मध्ये ड्रग्ज माफिया ललित पाटील हा उद्धव ठाकरे यांचा कार्यकर्ता होता. शिवबंधन बांधतांना फोटो समोर आलं होतं, असा आरोपही त्यांनी केला होता.

दरम्यान, आता आव्हाड यांनी थेट मुख्यमंत्र्याचे फोटोच शेअर केल्यानं शिंदे गटाकडून आव्हाडांच्या टीकेवर काय प्रतिक्रिया येते, हेच पाहणं महत्वाचं आहे.

Tags

follow us