Jitendra Awhad : मणिपूरमध्ये दोन महिलांची विवस्त्र धिंड काढल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या महिलांचा नग्न अवस्थेतील व्हिडिओ व्हायरल झाला आहे. दोन महिन्यांपूर्वी घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ आता व्हायरल झाल्यानं संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. या घटनेचे काल संसदेतही तीव्र पडसाद उमटले होत. देशातील जनता रस्त्यावर उतरून या घटनेचा निषेध करत आहे. त्यामुळे मणिपूर पोलिसांचे धाबे दणाणले आहेत. याप्रकरणी कारवाई करत पोलिसांनी आतापर्यंत चार जणांना अटक केली आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी ट्विट करत आणि हिटलरचं (Hitler)उदाहरण देत पीएम मोदींवर (PM Modi) जोरदार टीका केली. (Jitendra Awhad reacted on manipur iccident amd critisize pm modi)
मणिपूर सरकार दोन समुदायांमधील हिंसाचार रोखण्यासाठी प्रयत्न करत असतांना बुधवारी दोन महिलांना विवस्त्र करून त्यांची धिंड काढल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यामुळे राज्यातील तणाव वाढला आहे. या घटनेबाबत देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. आता जितेंद्र आव्हाड यांनीही आपली प्रतिक्रिया दिला. आव्हाडांनी ट्विट करत लिहिलं की, हे प्रातिनिधिक चित्र आहे 1941 मध्ये हिटलरने जर्मनीत पेरलेल्या ज्यू-द्वेषाचं…! अगदी मिसरूड फुडलेली जर्मन मुलेही ज्यू नागरिकांवर तुटून पडत.…! हिटलर त्याला जर्मन राष्ट्रवाद म्हणत जर्मन लोकांना बहकावत राहिला… आणि शेवटी त्याने जर्मनीला विनाशाकडे नेलं! आज या विचारसरणीचे प्रतिबिंब देशातील मुस्लिम आणि ख्रिश्चन यांच्याबद्दलच्या द्वेषात दिसते. इतिहासातील गाडलेली मढी उकरून ज्यांचा धर्म आणि पोट अबाधित राहातं, त्यांना वेळीच रोखून देश एकसंध, एकजिनसी आणि एकात्म ठेवणं हा खरा राष्ट्रवाद!, असं आव्हाडांनी म्हटलं.
https://twitter.com/Awhadspeaks/status/1682369756878495744?s=20
तर आणखी एक ट्विट आव्हाडांनी केलं. त्यांनी लिहिलं, स्त्री ही अनादी काळापासून एक भोगवस्तू ! मध्ययुगीन काळखंड तर स्त्रियांसाठी तमोयुग! युध्दात जडजवाहिरे, संपत्ती जशी लुटली जाई तशीच स्त्री लुटली जाई. जगाच्या पाठीवर आजही तिची इज्जत लुटली जाते. पहिल्या महायुद्धादरम्यान, जर्मन,फ्रान्स, रशिया पादाक्रांत केलेल्या सुटल्या तर रशियाने जर्मनीचा पाडाव झाल्यावर जर्मन महिलांची अब्रू लुटली. रोमन आणि ग्रीक लोकांनी तेच केले. चंगेज खानने तेच केले, आखाती सुलतानांनी तेच केले, जपान्यांनी चिनींचे तेच हाल केले. पश्चिम पाकिस्तानने बांगलादेशींवर असेच अत्याचार केले. पण, शिवरायांनी युद्धात स्त्रियांना अभय दिलं. त्यांच्या अब्रूचे रक्षण केले. तिला बाटवणारांचे हात कलम केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्रियांच्या चारित्र्याचे रक्षण केले! रांज्याच्या पाटलाने एका स्त्रीच्या अब्रूवर हात घातला तेव्हा १६ वर्षीच्या शिवरायांनी पाटलाचे हात-पाय कलम करून त्याचा चौरंग केला होता.
डायबिटीज रुग्णांनी पावसाळ्यात कोणती काळजी घ्यावी? फंगल इफेक्शनचा जास्त धोका
स्त्री ही अनादी काळापासून एक भोगवस्तू ! मध्ययुगीन कालखंड तर स्त्रीयांसाठी तमोयुग ! युद्धात जडजवाहिरे , संपत्ती जशी लुटली जाई तशीच स्त्री लुटली जाई. जगाच्या पाठीवर आजही तिची अब्रू लुटली जाते . महायुद्धकाळात जर्मनांनी फ्रान्स , रशिया आणि पादाक्रांत केलेल्या भागात सुटल्या तर रशियाने…
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) July 21, 2023
मोहिमेवर जाताना कुणी स्त्रीवर अत्याचार केला तर त्याचे मस्तक मारले जाईल असा सज्जड इशारा महाराज देत असत. दक्षिण दिग्विजयाच्या वेळी बेलवडीची गढी ताब्यात घेताना मल्लम्मा देसाईशी गैरवर्तन करणाऱ्यांचे हात कलम केले आणि गढी परत दिली. तिच्या मुलांना मांडीवर घेऊन प्याल्याने दूध पाजतानाच महाराजांचे भित्तिचित्र आजही त्या गढीत दिसते. अफझलखानाच्या वधानंतर महाराजांनी युद्धात शरणागती पत्करलेल्या महिलांना साडी आणि चोळी देऊन त्यांचा सत्कार केला आणि त्यांची पाठवणी केली.