Download App

Jitendra Awhad : ‘शरद पवारांना ऑफर म्हणजे वर्षातला सर्वात मोठा जोक’

Jitendra Awhad : शरद पवार यांना भाजपकडून ऑफर म्हणजे हा वर्षातला सर्वात मोठा जोक असल्याचं म्हणत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी शरद पवारांना भाजपची ऑफर आरोपांंचं खंडन केलं आहे. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी अजित पवार-शरद पवार गुप्त भेटीवर खुलासा केला होता. चव्हाण यांच्या दाव्यावरुन राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली होती. त्यानंतर शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केलीयं. आता शरद पवारांवर होणाऱ्या आरोपांचं जितेंद्र आव्हाडांकडून खंडन करण्यात आलं आहे.

शरद पवार अन् अजितदादांच्या बैठकीत काय घडलं? सुप्रिया सुळेंच्या उत्तरानेही संभ्रम कायम

जितेंद्र आव्हाड म्हणाले, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना कोण ऑफर देऊ शकतो, हा वर्षातला सर्वात मोठा जोक आहे. शरद पवारांची उंची किती, लोकसभेतील कारकीर्द किती? त्यांना कोण ऑफर देणार? जे कोणी काय बोलतात त्यांना बोलू द्या, पवार साहेबांनी सांगोल्याच्या पत्रकार परिषदेत स्पष्टपणे सांगितलं आहे की, मी कुठेही जाणार नाही. मी जातीयवादी पक्षाची हातमिळवणी करणार नाही. मी पुरोगामी विचारांचा पुरस्कर्ता आहे. मी तेच विचार पुढे घेऊन जाणार असल्याच पवारांनी स्पष्ट केल्याचं आव्हाडांकडून सांगण्यात आलं आहे.

PM मोदींच्या अमेरिकेतील खास पाहुण्यांची राहुल गांधींना भेटण्याची इच्छा; खाजगी बैठकीच्या मागणीवर बसले अडून

राष्ट्रवादीच्या मागेपुढे संभ्रम निर्माण करायचा आहे, हाच एक उद्देश आहे. बोलणाऱ्यांचं शरद पवार कोणाच्या ऐकायला बसलेत का तुमच्या घरात राजकारण सुरुवातीपासून चालत आलेला आहे ,त्यामुळे त्यांच्या विचारधारेत फरक पडलेला नाही. ते पुरोगामी विचार घेऊनच चाललेत यापुढे पुरोगामी विचार घेऊनच चालणार असल्याचा विश्वास जितेंद्र आव्हाडांनी यावेळी व्यक्त केला आहे.

यावेळी बोलताना जितेंद्र आव्हाडांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार जे काही म्हणतात त्यावर मी स्पष्टीकरण देणं हे हास्यास्पद होणार असल्याचं खोचक विधानही त्यांनी केलं आहे. प्लॅन बी म्हणण्यापेक्षा राजकीय, राष्ट्रीय पक्ष आहे. जो तो पक्ष आपली तयारी करत असतो. आघाडी झाली, तर प्लॅन ए नाहीतर बी आणि सी असं आहेच, असं विजय वडेट्टीवार म्हणाले होते.

Tags

follow us