Download App

तुम्ही पवार नसता तर, बारामतीतून निवडून आला असता का? आव्हाडांचा अजितदादांना खोचक सवाल

  • Written By: Last Updated:

Jitendra Awhad : राष्ट्रवादीतील फूट (NCP) होऊन जवळपास चार महिने उलटले आहेत. निवडणूक आयोगासमोर सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष कुणाचा, यासंदर्भातही सुनावणी सुरू आहे. दरम्यान अजित पवारांनी (Ajit Pawar) शरद पवारांवर गंभीर आरोप केले. कर्जत येथील शिबिरातील भाषणात त्यांनी राष्ट्रवादीतील फुटीबाबत अनेक गौप्यस्फोट केले. तसेच यावेळी त्यांनी पवारांच्या धरसोड वृत्तीवरही जोरदार टीका केली आहे. सरकारसोबत जा, मी राजीनामा देत आहे, असे शरद पवार म्हणाले होते, असा खुलासा त्यांनी केला. या सगळ्या बाबींवर आता आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी भाष्य केलं.

‘चार जागा लढवणार’; पण आम्हीच जिंकणार, जयंत पाटलांचं प्रत्युत्तर 

आज माध्यमांशी बोलतांना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, तुम्ही कधीपासून प्लॅनिंग करत होता, हे एकदा स्वत:च्या मनाला विचारा. ५ वर्षे शरद पवारांचे डोके कोणी खाल्ले आठवा? उद्विग्न असलेला माणूस काय करतो, तर असे निर्णय पटकन घेतो… भाजपमध्ये कोणाला जायचं होतं, हे मला माहित आहे… उठले की, भाजपात जाऊया, असं बोलत होतं. 2014 पर्यंत कोणीही काहीत नव्हतं. कारण, सत्ता होती. मात्र, त्यानंतर सत्ता गेली. त्यानंतर भाजपसोबत जायचं प्लॅनिंग अजित गटाने सुरू केलं, अस आव्हाड म्हणाले.

‘राजीनामा परत घेण्याचं आंदोलन पवारांच्या आदेशानेच’; अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट 

ते म्हणाले, शरद पवार यांचा राजकीय प्रवास कायमचा धुळीत मिळवायचा आणि सत्तेत राहायचं हे आम्हाला नामंजूर होतं…. सत्ता आमच्यासाठी महत्वाची नाही.. सत्ता हा जनतेची सेवा करण्याचा मार्ग आहे. आमचे काही विचार तत्त्व होते. तुम्हाला केवळ सत्ता हवी होती, बाकी विचार गेले खड्यात, असा आरोप आव्हाडांनी केला. तुम्हाला सत्तेत जायचं होतं, त्यासाठी तुम्हाला राष्ट्रवादी पक्षाला भाजपच्या दावणीला बांधायचं होतं. मात्र, शरद पवार अडसर होते, म्हणून त्यांना बाजूला काढायचं होतं. बाप्पाची चप्पल पायात आली म्हणून मुलगा बाप होत नसतो… फक्त पाय वाढलेला असतो, अक्कन नाही, असंही आव्हाडांनी ठणकावलं.

मुलांपेक्षा मुलीच वंशाचा दिवा असतात, असं काहींना वाटतं असं अजित पवार म्हणाले होते. यावर आव्हाडांनी भाष्य केलं. मी त्या घरात जन्माला नाही, त्यात माझा दोष आहे का, असं ते म्हणातात. इथपर्यंत तुम्ही खाली घसरता. तुम्ही पवार नसता तर बारातमीतून निवडून आला असता का? तुमची पुण्याई म्हणून त्यांच्या घरात जन्माला आला. आव्हांच्या घरात जन्माला आला असता तर तुम्ही चारवेळा उपमुख्यमंत्रीपद भुषवलं नसतं. बंडखोरीनंतर पक्षात घेतलं नसता. काकाच्या पाठीत खंजीर खुपसला. स्वत:च्या चुलत बहिणीचे हाल हाल केले, अशी टीका आव्हाडांनी केली.

भगीरथ बियाणीने कुणामुळं आत्महत्या केली, असं सांगत आव्हाडांनी अजित पवारांबाबत मोठा गौप्यस्फोट केला. बीड जिल्ह्यात २००२ पासून सुरू झालेल्या खुनाच्या मालिकेमागे कोण आहे? आम्हालाही बोलता येतं. मी कोणाच्या नादाला लागत नाही. माझ्याही नादी लागू नका, असा इशारा आव्हाडांनी दिला.

 

Tags

follow us