Kailas Gorantyal : विधानसभा निवडणुकीत महायुतीने (Mahayuti) प्रचंड मोठा विजय मिळवला. तर महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मोठ्या पराभावला सामोरं जावं लागलं. या पराभवानंतर मविआने ईव्हीएम (EVM) वर शंका घेतली. अनेक ठिकाणी ईव्हीएमच्या विरोधात आंदोलने देखील केली. इतकेच नाही तर बॅलेट पेपरवर (Ballot paper) निवडणुका घेण्याची आग्रही भूमिका मविआने घेतली. मात्र, आता काँग्रेसचे माजी आमदार आणि जालना विधानसभेतील पराभूत उमेदवार कैलास गोरंट्याल (Kailas Gorantyal) यांनी वेगळीच भूमिका घेतली.
ब्रिस्बेनमध्ये टीम इंडिया देणार ऑस्ट्रेलियाला धक्का, रोहित शर्मा घेणार मोठा निर्णय
गोरंट्याल यांनी आपल्या पराभवासाठी ईव्हीएमला जबादार न धरता पराभवाचे दुसरेच कारण दिलेय. त्यांनी आपल्या पराभवासाठी ‘लाडकी बहीण योजने’ला जबाबदार धरले.
लाडकी बहीण योजनेमुळे आपला पराभव झाल्याचे कैलास गोरंट्याल यांनी सांगितले. या योजनेमुळे काँग्रेसचे दिग्गज नेते बाळासाहेब थोरात आणि पृथ्वीराज चव्हाण यांचाही पराभव झाल्याचा दावा गोरंट्याल यांनी केला आहे. दरम्यान, जालना विधानसभा मतदारसंघातून कैलास गोरंट्याल यांचा 31651 मतांनी पराभव झाला. जालन्यात शिवसेनेचे उमेदवार अर्जुन खोतकर यांनी त्यांचा पराभव केला. कैलास गोरंट्याल यांना 73 हजार 14 तर अर्जुन खोतकर यांना 1 लाख 4 हजार 665 मते मिळाली.
Donald Trump Inauguration : चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिपनिंग यांना शपधविधीचं निमंत्रण…
लाडकी बहीण योजनेत बदल केल्यास…
सोशल मीडियावर लाडकी बहीण योजनेच्या निकषांत बदल करण्यात आल्याचं, लाडक्या बहिणींना अपात्र करण्याचं काम सरकारच्या वतीने सुरू असल्याचे मेसेज फिरत आहेत. यावरून कैलास गोरंट्याल यांनी महायुतीवर टीका केली. लाडकी बहीण योजनेत बदल होणार असल्याच्या चर्चांवर ते म्हणाले की, राज्यात महायुती सरकार लाडकी बहीण योजनेमुळेच सत्तेवर आले आहे. पण आता या सरकारचे असे झाले की, गरज सरो, वैद्य मरो. आता या योजनेचा लाभ महिलांना द्यायचा नाही, असे त्यांनी ठरवले आहे. बहिणींसाठी आम्ही रस्त्यावर उतरून संघर्ष करणार असल्याचा इशाराही गोरंट्याल यांनी दिला आहे.
ईव्हीएम विरोधात राहुल गांधी यात्रा काढणार?
काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनीही ईव्हीएमवर शंका उपस्थित केल्या आहेत. मारकडवाडी ग्रामस्थांनी बॅलेट पेपरवर मतदान प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला होता मात्र प्रशासनाने त्यास विरोध केला. विरोधी पक्षनेते राहुल गांधी मरकडवाडीला भेट देणार असल्याची चर्चा होती. मात्र, त्यांनी भेट दिली नाही. मात्र राहुल गांधी ईव्हीएमविरोधात यात्रा काढणार असल्याची चर्चा काँग्रेसच्या वरिष्ठ वर्तुळात आहे.
तर उज्जल निकम यांनी ईव्हीएमच्या मुद्द्यावरून काही लोक रान पेटवत आहेत. पण, माझ्या मते याला कायदेशीर आधार नाही, असं सांगत पराभूत झाल्यामुळे अशा रीतीने याचे भांडवल करणे, सामान्य जनतेची दिशाभूल करणे, हे लोकशाहीत योग्य नाही, असं उज्जव निकम म्हणाले.