Download App

कर्जत-जामखेड मतदारसंघ भाजपच्या वाट्याला? राम शिंदे पुन्हा मैदानात उतरणार

कर्जत-जामखेड मतदारसंघाच्या जागेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागणी लावून धरली असून भाजपला जागा गेल्यास राम शिंदे पुन्हा मैदानात उतरणार असल्याचं बोललं जात आहे.

karjat-Jamkhed Assembly Constituency : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून जोरदार हालचाली सुरु आहेत. एकीकडे महाविकास आघाडी (MVA) तर दुसरीकडे महायुती सरकारच्या जागावाटपासाठी मॅरेथॉन बैठका सुरु असतानाच अहमदनगरमधील कर्जत-जामखेड मतदारसंघाचा मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण या मतदारसंघावर भाजपसह राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून (Ajit Pawar Group) दावा ठोकण्यात येत आहे. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी या जागेसाठी मागणी लावून धरलीयं. त्यामुळे कर्जत मतदारसंघाची जागा भाजपला सोडली तर या मतदारसंघातून भाजपचे नेते राम शिंदे पुन्हा मैदानात उतरणार असल्याचं बोललं जात आहे.

शरद पवारांसोबत जाणार का? अजितदादांनी वाढवला सस्पेन्स, म्हणाले, ‘आम्हाला पुन्हा…’

विशेष म्हणजे या मतदारसंघासाठी महायुतीच्या जागावाटपाच्या चर्चेमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आग्रही मागणी केल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांकडून समोर आलीयं. तर याआधीच राष्ट्रवादी अजित पवार गटाने महायुतीकडे ही जागा मागितली होती. या मतदारसंघात शरद पवार गटाचे विद्यमान आमदार रोहित पवार आहेत. या मतदारसंघासाठी राष्ट्रवादीपाठोपाठ भाजपची मोठी ताकद आहे. त्यामुळे आता या मतदारसंघात ज्या उमेदवाराची विजयाची खात्री असेल त्या पक्षाला ही जागा सुटणार असल्याचं सांगण्यात येत आहे. हा मतदारसंघ आधीपासूनच भाजपचा गड मानला जात होता. मात्र, मागील निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजपच्या राम शिंदे यांचा पराभव केला होता.

उद्धव ठाकरेंकडून अमित शाहांचा बाजारबुणगे म्हणून उल्लेख, म्हणाले, ‘हिंमत असेल तर…’

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्याविरोधात धारधार टीका केली. अजित पवार गटातील नेतेही रोहित पवार यांना लक्ष्य करताना अनेकदा दिसले आहेत. २०१९ साली मीच रोहितला कर्जत-जामखेडमधून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला होता, तसेच त्याला मदत केली होती, असा दावा अजित पवार यांनी मध्यंतरी भाषणात केला होता. तर रोहित पवार यांनी पलटवार करताना बारामती लोकसभेप्रमाणेच कर्जत-जामखेडमधूनही पवार कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी दिली जाऊ शकते, अशी शक्यता वर्तविली.

Urmila Matondkar: ‘रंगीला गर्ल’चा 8 वर्षांत मोडला संसार? अभिनेत्रीकडून घटस्फोटाची याचिका दाखल

आता पुन्हा 2024 निवडणुकीत ही जागा भाजपला सुटल्यास राम शिंदे पुन्हा उमेदवार असणार हे जवळपास निश्चित आहे. तर दुसरीकडे रोहित पवारांच्या विरुद्ध पवार कुटुंबातील व्यक्ती उमेदवार असेल अशीदेखील चर्चा सुरु आहे. दरम्यान, भाजपने या मतदारसंघासाठी आग्रही मागणी केल्याने हा मतदारसंघ नेमकं कोणत्या पक्षाला जाणार? हे पाहणं महत्वाचं ठरेल.

follow us