करुणा शर्मा ( Karuna Sharma ) यांनी पुन्हा एकदा माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) आमदार धनंजय मुंडे ( Dhananjay Munde ) यांच्यावर निशाणा साधला आहे. पत्रकार परिषद घेत त्यांनी मुंडेंवर अनेक आरोप केले आहेत. तसेच यावेळी बोलताना त्यांनी मुंडे यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी देखील केली आहे. करुणा शर्मा यांनी केलेल्या आरोपांमुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
(Sharad Pawar यांनी ‘गुगली’ टाकताच भाजपवाले शरद पवारांवर तुटून पडले)
करुणा शर्मा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक पत्र लिहले आहे. त्या पत्रात त्यांनी धनंजय मुंडेंवर खळबळजनक आरोप केले आहेत. धनंजय मुंडे यांनी मला अनेकवेळा जीवे मारण्याचे प्रयत्न केले आहेत. मला वारंवार जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. माझा मानसिक छळ केला जात आहे, असे आरोप करुणा शर्मा यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना लिहिलेल्या पत्रात केले आहेत.
त्यामुळे माझी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी आहे की, धनंजय मुंंडे यांची माझ्या खर्चाने नार्को टेस्ट करण्यात यावी. त्यानंतर दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल, अशा शब्दात त्यांनी मुंडेंना टारगेट केले आहे. तसेच या टेस्टमुळे धनंजय मुंडे हे किती खरे व किती खोटे आहेत, हे सर्वांना कळेल, असे करुणा शर्मा म्हणाल्या आहेत.
तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटल्यानंतर मला वारंवार जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. आपण सगळ्यांनी पाहिले की पोलिसांसमोर माझ्या गाडीत रिव्हॉल्वर ठेवले होते. मला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला, असा आरोप करुणा शर्मा यांनी केला आहे.
दरम्यान धनंजय मुंडे यांचा काही दिवसांपूर्वी परळी येथे अपघात झाला होता. यानंतर ते मुंबईतील रुग्णालयात दाखल होते. त्यांची तब्येत आता ठीक झाली असून ते पिंपरी चिंचवडच्या पोटनिवडणुकीत नाना काटे यांच्या प्रचारसाठी देखील आले होते. पण करुणा शर्मा यांनी केलेल्या आरोपांमुळे ते पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता आहे.