Download App

Kasba Bypoll Voting दुपारी ३ वाजेपर्यंत ३०.०५ टक्के मतदान

  • Written By: Last Updated:

पुणे : कसबा पेठ (Kasba Bypoll) पोटनिवडणुकीत दुपारी ३ वाजेपर्यंत ३०.०५ टक्के मतदान झाले तर चिंचवड मतदार संघात ३०.५५ टक्के मतदान झाले आहे. आता फक्त मतदानासाठी शेवटचे दोन तास राहिले आहे. त्यामुळे मतदानची टक्केवारी आणखी वाढणार याकडे लक्ष लागले असून वाढणाऱ्या टक्केवारीचा फायदा भाजपला (BJP) होणार की महाविकास आघाडीला (MVA) होणार याची देखील उत्सुकता लागली आहे.

कसब्यात राडा, भाजपच्या बीडकरांकडून काँग्रेस कार्यकर्त्याला मारहाण

आज सकाळी सात वाजल्यापासून कसबा आणि चिंचवड या पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली. मात्र, सकाळच्या सत्रात मतदारांचा फारसा उत्साह दिसून आला नाही. त्यामुळे कसब्यात ६.५ टक्के तर चिंचवडला केवळ ३.५२ टक्के इतकेच मतदान झाले. सकाळी ११ नंतर मात्र मतदार मोठ्या संख्येने बाहेर पडू लागले. कसब्यात दुपारी १ वाजेपर्यंत १८.५ तर चिंचवडला २०.६८ टक्के इतके मतदान झाले आहे.

दुपारी तीन वाजेपर्यंत कसबा आणि चिंचवड या दोन्ही मतदार संघात समसमान मतदानाची टक्केवारी होती. कसब्यात ३०.०५ टक्के तर चिंचवड मतदार संघात ३०.५५ टक्के असे मतदान झाले आहे.

Tags

follow us