कसब्यात राडा, भाजपच्या बीडकरांकडून काँग्रेस कार्यकर्त्याला मारहाण

कसब्यात राडा, भाजपच्या बीडकरांकडून काँग्रेस कार्यकर्त्याला मारहाण

Kasaba By Election : कसबा आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीत हाय होल्टेज ड्रामा पाहण्यास मिळत आहे.आताही पुन्हा असाच प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. या दोन्ही निवडणुका भाजप आणि महाविकास आघाडीने प्रतिष्ठेच्या केल्या आहेत. त्यात आता येथे भाजपच्या गणेश बीडकरांनी काँग्रेस कार्यकर्त्यावर हल्ला केल्याचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

वाचा : Kasba : पोटनिवडणुकीच्या मतदानासाठी मतदारांमध्ये उत्साह

कसबा मतदारसंघातील मालधक्का चौकातील अशोक कॉम्प्लेक्स परिसरात ही घटना घडली. या ठिकाणी गणेश बीडकर हे भाजप कार्यकर्त्यांसह पैसे वाटप करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला. या ठिकाणी काँग्रेसचे कार्यकर्ते धडकले. त्यानंतर तणावाचे वातावरण निर्माण झाले. मारहाणीच्या घटनेनंतर काँग्रेस कार्यकर्ते पोलीस स्टेशनमध्ये जमा झाले. काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी मंत्री रमेश बागवे देखील येथे हजर होते.

आधी भाजपवर गुन्हे दाखल करा; ‘त्या’ फोटोवर रुपाली ठोंबरेंचे स्पष्टीकरण

दुपारी तीन वाजेपर्यंत कसबा मतदारसंघात ३०.५ टक्के मतदान झाले आहे. तर चिंचवड मतदारसंघात ३०.५५ टक्के मतदान झाले आहे. दुपारी एकपर्यंत कसबा मतदारसंघात १८ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर दोन तासांत मतदानाचा टक्का वाढला आहे.

याआधी चिंचवड येथेही असाच प्रकार घडला होता. चिंचवड येथील मतदान केंद्रावर जोरदार राडा झाला. पिंपरी गुरव येथील मतदान केंद्रावर माजी नगरसेवक सागर अंघोळकर आणि राहुल कलाटे यांच्या समर्थकांत प्रथम बाचाबाची आणि नंतर जोरदार हाणामारी झाल्याची माहिती मिळाली. हा वाद नेमका कशामुळे झाला याचे कारण अद्याप समजलेले नाही. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत हा वाद मिटवला.  त्यामुळे येथील परिस्थिती नियंत्रणात आली. मतदान सुरळीत सुरू आहे. मतदानाच्या शेवटच्या टप्प्यात मतदानाने वेग घेतल्याचे दिसून येत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube