Download App

संजय राऊतांमध्ये हिंमत असेल तर…; राऊतांच्या टीकेवर सोमय्यांचं थेट आव्हान

राऊतांनी न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्यासमोर याचिका दाखल करावी आणि मोदी मोदक खायला आले म्हणून कोर्टाने असा निर्णय दिला, असा उल्लेख याचिकेत करावा.

  • Written By: Last Updated:

Kirit Somayya : अब्रुनुकसानीच्या केसमध्ये ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना कोर्टाने दोषी ठरवलं आहे. मेधा सोमय्य (Medha Somaiya) यांनी संजय राऊत यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकला होता. या प्रकरणात माझगाव कोर्टाने (Mazgaon Court) त्यांना दोषी ठरवत 15 दिवसांची शिक्षा सुनावली. यावरून राऊतांनी भापज आणि न्यायव्यवस्थेवर टीका केली आहे. दरम्यान, राऊतांनी केलेल्या टीकेवरून किरीट सोमय्यांनी (Kirit Somayya)राऊतांना थेट चॅलेंज दिलं.

Ranveer Allahbadia च्या युट्यूबवरुन सर्व व्हिडिओ डिलीट? नेमकं काय झालं? 

हिंमत असेल तर राऊतांनी न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्यासमोर याचिका दाखल करावी आणि पंतप्रधान मोदी तुमच्या घरी मोदक खाण्यासाठी आले म्हणून कोर्टाने असा निर्णय दिला, असा उल्लेख अपील याचिकेत करावा, असं चॅलेंज दिलं.

किरीट सोमय्यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोतलांना ते म्हणाले की, संजय राऊत यांनी सोमय्या कुटुंबावर 27 आरोप केले. यात एकाचीही तक्रार केली नाही, किंवा कागदपत्रे दिले नाही, म्हणून आम्ही ठरवले की कोणतेही एक प्रकरण घेऊन आम्ही न्यायालयात जाऊ. यानंतर आम्ही राऊतांकडून मेधा सोमय्यांवर 100 कोटी लादल्याचे जे आरोप होत होते, त्यावर कोर्टात याचिका दाखल केली. यासंदर्भात संजय राऊत एक कागदही देऊ शकले नाही, ते नुसते वेगवेगळे दावे करत असतात.
म्हणून आज ही शिक्षा झाली.

सोमय्या पुढे म्हणाले की, संजय राऊत यांना 15 दिवसांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यांना ब्यात घेण्यात आले असून 25 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. ही रक्कम तक्रारदार प्राध्यापक डॉ. मेधा सोमय्या यांना दिली असल्याचं सोमय्या म्हणाले.

Zareen Khan: झरीन खानला ‘या’ बॉलिवूड दिग्दर्शकासोबत करायचे आहे काम 

पंतप्रधान गणपतीचे मोदक खायला सरन्यायाधीशांकडे जातात. मग भ्रष्टाचारांविरोधात आवाज उठवणाऱ्या आमच्यासारख्यांना न्याय कसा मिळणार? हे अपेक्षित होते. कारण, न्यायव्यवस्थेचं संघीकरण झालं आहे, असे आरोप राऊतांनी केली. यावर बोलतांना सोयय्या म्हणाले, मी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना आव्हान देतो की त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्यासमोर याचिका दाखल करावी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी तुमच्या घरी मोदक खाण्यासाठी आले होते, म्हणून कोर्टाने असा निर्णय दिला, असा उल्लेख अपील याचिकेत करावा, असं आव्हान सोमय्यांनी दिलं.

नेकमं प्रकरण काय आहे?

मीरा भाईंदरमध्ये 154 सार्वजनिक शौचालये बांधण्यात आली असून त्यापैकी 16 शौचालय बांधण्याचे कंत्राट मेधा सोमय्या यांच्या युवक फाऊंडेशनला देण्यात आले आहे. मात्र राऊत यांनी मेधा यांच्यावर बनावट कागदपत्रे सादर करून 100 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला. यानंतर मेधा यांनी राऊत यांच्यावर मानहानीचा खटला दाखल केला होता.

follow us