कीर्तनकार इंदुरीकर महाराजांच्या सासूबाई बहुमताने विजयी

अहमदनगर : राज्यातील एकूण ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींचा निकाल आज जाहीर होत आहे. यातच अनेक धक्कादायक निकाल समोर येत आहे. यातच कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या सासूबाई शशिकला पवार या ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झाल्या आहेत. संगमनेरच्या निरवंडे ग्रामपंचायतीत शशिकला पवार या बहुमताने निवडून आल्या आहेत. शशिकला पवार यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. विशेष बाब […]

election

WhatsApp Image 2022 12 20 At 1.22.01 PM

अहमदनगर : राज्यातील एकूण ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींचा निकाल आज जाहीर होत आहे. यातच अनेक धक्कादायक निकाल समोर येत आहे. यातच कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या सासूबाई शशिकला पवार या ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झाल्या आहेत.

संगमनेरच्या निरवंडे ग्रामपंचायतीत शशिकला पवार या बहुमताने निवडून आल्या आहेत. शशिकला पवार यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती.

विशेष बाब म्हणजे या निवडणुकीत विखे आणि थोरात गटाला शह देत इंदोरीकर महाराजांच्या सासुबाई शशिकला पवार या निवडणून आल्या व सरपंचपदी विराजमान झाल्या आहेत.

Exit mobile version