Download App

समरजित घाटगेंना भाजपने दाणे घालू नयेत…; हसन मुश्रीफांनी ठणकावले

विधानसभेसाठी समरजित घाटगेंना भाजपने दाणे घालू नयेत, अशा शब्दात मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपला ठणकावलं आहे.

  • Written By: Last Updated:

Hasan Mushrif : लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे (Assembly elections) वेध लागले. कागल विधानसभा मतदारसंघात यंदा भाजपच्या समरजित घाटगेंनी (Samarjit Ghatge) विधानसभेची तयारी सुरू केली. त्यामुळं महायुतीच्या (Mahayuti) दोन उमेदवारांमध्येच कालगमध्ये लढत होण्याची शक्यता आहे. अजित पवार गटाचे मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) आणि घाटगे यांच्यात लढत होऊ शकते. यावरून आता मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपलाच खडे बोल सुनावले.

PTI Banned : शाहबाज सरकारचा मोठा निर्णय; इम्रान खान यांच्या ‘पीटीआय’वर पाकिस्तानात बंदी! 

विधानसभेसाठी समरजित घाटगेंना भाजपने दाणे घालू नयेत, अशा शब्दात मुश्रीफांनी भाजपला ठणकावलं.

हसन मुश्रीफ यांनी लेट्सअप मराठीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. समरजित घाटगेंनी विधानसभा लढण्याची तयारी सुरू केली असून भाजपकडून उमेदवारी मिळण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत, याविषयी विचारल असता मुश्रीफ म्हणाले, लोकशाहीत प्रत्येकाला उभं राहण्याचा अधिकार आहे. भाजपमधीलच नाही तर अनेक जण माझ्या विरोधात उभे राहू शकतात. कारण, महायुती म्हणून तीन पक्ष एकत्र आल्याने अनेकांना संधी मिळणार नाही. तिकीट मिळालं नाही तर ते आपली पाच वर्ष फुकट घालवणार नाहीत. ते उभं राहणाच आहेत. कारण त्यांच्या राजकीय अस्तित्वाचा प्रश्न आहे. फक्त पक्षाने त्यांना पाठिंबा देऊ नये. दाणे घालता कामा नये, असं मुश्रीफ म्हणाले.

PTI Banned : शाहबाज सरकारचा मोठा निर्णय; इम्रान खान यांच्या ‘पीटीआय’वर पाकिस्तानात बंदी! 

भाजपने घाटगेंना दाणे घालता कामा नये, तरच सत्ता येईल. अपक्ष बंडखोरांना पाठिंबा दिला तर सत्तेत अडचणी येऊ शकतात, असा इशाराही मुश्रीफांनी दिला. मला ईडीच्या प्रकरणात अडकवण्यासाठी समरजित घाटगेंनीच प्रयत्न केले होते, असा आरोपही मुश्रीफांनी केला.

सोमय्यांविषयी राग-लोभ नाही
किरीट सोमय्यांनी केलेल्या आरोपांविषयी विचारले असता मुश्रीफ म्हणाले, सोमय्या भारतीय जनता पक्षात असतांना त्यांनी आरोप केले. विरोधक म्हणून त्यांनी त्याचं काम केलं आणि मी कोर्टातून जामीन मिळवण्याचं माझं काम केलं. आता आम्ही महायुतीत आहेत. मला त्यांच्याविषयी राग नाही. मी राग लोभ धरत नाही, असं मुश्रीफ म्हणाले.

follow us