Rajya Sabha Election : भाजपचा राज्यसभेत होणार गेम? संख्याबळ घटले
Rajya Sabha Election : लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपला (BJP) मोठा फटका बसला आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला फक्त 240 जागांवर विजय मिळवता आला आहे. तर दुसरीकडे आता भाजपचे राज्यसभेत देखील संख्याबळ कमी झाले आहे. शनिवारी भाजपचे चार नामनिर्देशित सदस्य राज्यसभेतून (Rajya Sabha) निवृत्त झाल्याने राज्यसभेत भाजपचे संख्याबळ आता 86 वर आले आहे. तर एनडीएच्या (NDA) सदस्यांची संख्या 101 राहिली आहे. तर काँग्रेसची (Congress) राज्यसभेत आता ताकद वाढताना दिसत आहे.
सध्या राज्यसभेत 226 खासदार आहेत आणि 19 रिक्त जागा आहेत. आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात दोन अपक्ष, सात नामनिर्देशित सदस्य, एआयएडीएमके आणि वायएसआरसीपी सारख्या मित्रपक्षांच्या समर्थनासह भाजप आता देखील महत्त्वपूर्ण विधेयके सभागृहात पास करू शकतो मात्र जर भाजपला एनडीएचे मित्रपक्षांवरील अवलंबित्व कमी करायची असेल तर नामनिर्देशित रिक्त जागा लवकरात लवकर भरणे भाजपसाठी महत्त्वाचे ठरणार आहे.
तर दुसरीकडे राज्यसभेत एकूण 19 रिक्त जागांपैकी 4 जागा जम्मू-काश्मीरमधील आहेत मात्र जेव्हा पर्यंत तिथे विधानसभा निवडणुका होणार नाही तेव्हा पर्यंत राज्यसभेच्या निवडणुका होऊ शकत नाही. याच बरोबर नामनिर्देशित सदस्यांच्या चार जागा रिक्त आहेत आणि 11 जागांवर निवडणूक होणार आहे. या आकरा जागांमध्ये महाराष्ट्र, तेलंगणा, मध्य प्रदेश, त्रिपुरा, राजस्थान, हरियाणा आणि आसामचा समावेश आहे. त्यामुळे भाजपला लवकरात लवकर नामनिर्देशित सदस्यांच्या चार जागा भरावे लागणार आहे. नाहीतर राज्यसभेत भाजप अडचणीत येऊ शकतो.
शनिवारी राकेश सिन्हा, राम शकल, सोनल मानसिंग आणि महेश जेठमलानी हे चार नामनिर्देशित राज्यसभेतून निवृत्त झाले आहे. तर दुसरीकडे गुलाम अली हे नामनिर्देशित सदस्य असून ते सप्टेंबर 2028 मध्ये निवृत्त होणार आहेत.
विशाळगड तोडफोड प्रकरण, संभाजीराजे छत्रपती शाहूवाडी पोलीस ठाण्यात हजर
माहितीसाठी, राष्ट्रपती सरकारच्या शिफारशीनुसार 12 सदस्यांची राज्यसभेवर नियुक्ती करते. सध्याच्या सभागृहात, त्यापैकी सात जणांनी स्वत:ला अलिप्त ठेवले (भाजपचा भाग नाही) आहे परंतु कोणताही विधायक मंजूर करताना ते सत्ताधारी भाजपच्या बाजून मतदान करतात.