Rajya Sabha Election : चौदा दिवस बाकी असतानाच जेपी नड्डा यांचा राज्यसभेचा राजीनामा

Rajya Sabha Election :  चौदा दिवस बाकी असतानाच जेपी नड्डा यांचा राज्यसभेचा राजीनामा

JP Nadda : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) यांनी राज्यसभेचा राजीनामा (Rajya Sabha Election) दिला आहे. राज्यसभेच्या अध्यक्षांनी जेपी नड्डा यांचा राजीनामा स्वीकारला आहे. नड्डा यांनी हिमाचलमधून निवडून आलेल्या जागेचा राजीनामा दिला आहे. ते आता गुजरातमधून नियुक्त झालेल्या जागेवर खासदार राहणार आहेत.

जेपी नड्डा यांचा हिमाचलच्या जागेचा कार्यकाळात 14 दिवस शिल्लक होता. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत 15 राज्यांतील 56 राज्यसभेच्या जागांवर निवडणुका झाल्या आहेत. यामध्ये जेपी नड्डा गुजरातमधून बिनविरोध राज्यसभेचे खासदार म्हणून निवडून आले आहेत.

Electoral Bonds : SBI ने इलेक्टोरल बाँड्सची माहिती देण्यासाठी मागितला 30 जून पर्यंत वेळ

27 फेब्रुवारी रोजी 15 राज्यांमधील 56 जागांसाठी राज्यसभेच्या निवडणुका झाल्या होत्या. त्यापैकी 41 जागांवर उमेदवार बिनविरोध विजयी झाले. तर 15 जागांवर निवडणूक झाली. या जागा उत्तर प्रदेश, हिमाचल आणि कर्नाटकातील होत्या. यूपीमध्ये 10, हिमाचलमध्ये 1 आणि कर्नाटकमध्ये 4 जागांवर निवडणूक झाली. यूपीमधील 10 जागांपैकी 8 भाजपकडे, तर 2 सपाकडे गेल्या. त्याचवेळी हिमाचलमध्येही भाजपने बाजी मारली. कर्नाटकात काँग्रेसने 3 तर भाजपने 1 जागा जिंकली.

‘मराठ्यांनी मर्यादा सोडल्यावर करेक्ट कार्यक्रमच’; जरांगेंचाही CM शिंदेंना थेट इशारा

follow us
  • fb
  • instagram
  • youtube