‘मराठ्यांनी मर्यादा सोडल्यावर करेक्ट कार्यक्रमच’; जरांगेंचाही CM शिंदेंना थेट इशारा
Manoj Jarnage Patil : सरकारने मर्यादा सोडल्यावर मराठे कसा करेक्ट कार्यक्रम करतात पाहा, या शब्दांत मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना इशारा दिला आहे. दरम्यान, उपोषण सोडल्यानंतर मनोज जरांगे आता राज्यभर संवाद साधत आहेत. सोलापुरात आज त्यांनी मराठा बांधवांशी संवाद साधला आहे. यावेळी ते बोलत होते.
अनंत-राधिकाच्या कार्यक्रमात शाहरुखचा गौरीसोबत रोमँटिक डान्स; सोशल मीडियावर चर्चांना…
मनोज जरांगे पाटील म्हणाले, आता देवेंद्र फडणवीसांची भाषा आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलू लागले आहेत. पूर्वी सहा महिने शिंदेंवर विश्वास ठेऊन सहा महिन्यांचा वेळ दिला होता. ते आता आम्हाला उलट बोलायाला लागलेत. कोणी लिमिट तोडलं तर मी करेक्ट कार्यक्रम करतो असं मुख्यमंत्री म्हणतात, तर मग सरकारने मर्यादा सोडल्यावर मराठे कसा करेक्ट कार्यक्रम करतात ते पाहा, या शब्दांत मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांनाही इशारा दिला आहे.
काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि काँग्रेस नेते नाना पटोले यांच्या संवादाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये एकनाथ शिंदे आणि नाना पटोले संवाद साधत होते. या संवादात कोणी लिमिट क्रॉस केली की कार्यक्रम करतोचं असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होतं. त्यावरुन मनोज जरांगे यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना त्यांच्याच भाषेत उत्तर दिलं आहे.
मनोज जरांगे म्हणाले, 9 तारखेपर्यंत 26 हजार अर्जाचा आकडा गेलेला दिसेल. हा निर्णय माझा नाही समाजाचा आहे. गावातील पोस्टर काढून आमच्यावर गुन्हे दाखल करत आहेत. त्यामुळे दारावरच आम्ही आता पोस्टर लावणार आहोत. निवडणुकीत आमच्या दारात राजकीय नेत्यांनी यायचं नाही, असंही ते म्हणाले आहेत.
Horoscope Today: आज ‘या’ राशींना मिळणार चांगली बातमी! मोठा धनलाभ होण्याची शक्यता
मराठा समाजासाठी मी जीव द्यायला ही तयार आहे. त्यामुळे मराठा समाज जे सांगेल ते मी ऐकले आहे. मराठा समाज आरक्षणाबाबत शांत राहिला पाहिजे. यासाठी मी उपोषण करतो. फडणवीस यांचा त्या दिवशी राज्य बेचिराख करण्याचा प्रयत्न होता. मात्र माझी इच्छा नव्हती
ज्या दिवशी अंतरवाली सराटीतून सागर बंगल्याकडे निघालो होतो त्यावेळेस गृहमंत्र्यांना दंगल घडवायची होती. त्या दिवशी चकमक झाली असती तर राज्य बेचराख झाले असते., असंही जरांगे म्हणाले आहेत.
तर राजकीय करिअर संपवून टाकणार…
राज्य सरकारने असंच सुरु ठेवलं, गुन्हे दाखल कराल, 10% च आरक्षण आमच्यावर लादलं तर आंतरवाली सराटीमध्ये ज्याप्रमाणे विराट सभा झाली. तशीच पुन्हा एकदा करुन तुमचं राजकीय करिअर संपवून टाकू. मी जाती जेलमध्ये आंदोलन करेन आणि आरक्षण घेतल्याशिवाय मी हटणार नाही. मी मेलो तरी आरक्षण आरक्षण आरक्षण म्हणत राहणार आणि पोरांच्या डोक्यावर ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही, असंही मनोज जरांगेंनी स्पष्ट केलं आहे.