अनंत-राधिकाच्या कार्यक्रमात शाहरुखचा गौरीसोबत रोमँटिक डान्स; सोशल मीडियावर चर्चांना…

अनंत-राधिकाच्या कार्यक्रमात शाहरुखचा गौरीसोबत रोमँटिक डान्स; सोशल मीडियावर चर्चांना…

Anant-Radhika Pre Wedding: अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंटचा (Radhika Merchant) प्री-वेडिंग (Pre Wedding) फंक्शन गुजरातमधील जामनगरमध्ये मोठ्या थाटामाटात पार पडला. काल या तीन दिवसांच्या भव्य कार्यक्रमाचा शेवटचा दिवस होता, या कार्यक्रमाला बॉलीवूडचे (Bollywood) अनेक स्टार्सनी जोरदार हजेरी लावली होती. या भव्य कार्यक्रमाचे सोशल मीडियावर जोरदार व्हिडिओ व्हायरल होत आहेत.


शाहरुखने गौरीसोबत रोमँटिक डान्स: दरम्यान, बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खानचा एक व्हिडिओ समोर आला आहे, यामध्ये त्याने पुन्हा एकदा आपल्या रोमँटिक स्टाईलने चाहत्यांची मने जिंकली आहेत. व्हिडिओमध्ये किंग खान पत्नी गौरी खानसोबत रोमँटिक डान्स करताना दिसत आहे. व्हायरल होत असलेल्या वीरा जराच्या ‘मैं यहाँ हूं’ या गाण्यावर दोघांनीही डान्स जोरदार डान्स केला.

व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहते खुश: शाहरुखच्या या व्हिडिओवर चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत. या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात कमेंट्सचा पूर आला आहे. एका यूजरने कमेंटमध्ये लिहिले की, ‘आम्हाला नवीन वीर जरा सापडला.’ त्यामुळे अनेकांनी या व्हिडिओला खूप सुंदर म्हटले आहे. अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगला शाहरुख खान पत्नी गौरी, मुलगी सुहाना आणि मुले अबराम खान-आयर्न खानसोबत पोहोचला आहे.

वुमन फिटनेस लीडर ऑफ द इयर पुरस्कार सोहळा: ‘या’ लोकप्रिय अभिनेत्रीने पटकावला

पहिल्या दिवशी पॉप सिंगर रिहानाने आपल्या दमदार परफॉर्मन्सने प्रेक्षकांना मन मोहित केले, तर दुसऱ्या दिवशी पंजाबी गायक दिलजीत दोसांझने आपल्या धमाल स्टाइलने शोमध्ये धुमाकूळ घातला. शेवटचा दिवस संस्मरणीय बनवण्यासाठी अंबानी कुटुंबाने बॉलिवूड आणि हॉलिवूडमधील अनेक सुप्रसिद्ध गायकांना आमंत्रित केले. त्यात अरिजित सिंग, प्रीतम, श्रेया घोषाल, उदित नारायण, शान, सुखविंदर सिंग, मोहित चौहान, मोनाली ठाकूर, लकी अली आणि नीती मोहन या प्रसिद्ध गायकांचा समावेश होता. इतकंच नाही तर हॉलिवूड स्टार एकॉननेही या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. त्यांनी रंगमंचावर अनेक गाण्याचे सादरीकरणही केले.

तिसऱ्या दिवशी सोहळा सुरू होण्यापूर्वी अंबानी कुटुंबातील सर्व पाहुण्यांसोबत गणेश आरतीही करण्यात आली. त्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज