Bigg Boss Marathi: बिग बॉस मराठी’च्या घरात येणार DJ Kratex; आज होणार मिड वीक एव्हिक्शन

Bigg Boss Marathi: बिग बॉस मराठी’च्या घरात येणार DJ Kratex; आज होणार मिड वीक एव्हिक्शन

Bigg Boss Marathi Season 5 Day 68 : ‘बिग बॉस मराठी’चा खेळ (Bigg Boss Marathi Season 5) आता शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचला आहे. (Bigg Boss Marathi ) शेवटच्या टप्प्यात आता हा खेळ आणखी रंगतदार होत चालला आहे. काहीच दिवसांत या पर्वाचा विजेता किंवा विजेती जाहीर होणार आहे. (Video Viral ) अशातच आज घरात DJ Kratex आपल्या स्टाईलने प्रेक्षकांचं आणि घरातील सदस्यांचं चांगलच मनोरंजन करणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे आज घरात ‘मिड वीक एव्हिक्शन’ (MID Week Eviction) देखील पार पडणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)


DJ Kratex हा भारतातील नावाजलेला डीडे आणि संगीत निर्माता आहे. विविध प्रकारच्या संगीताची आजवर त्याने निर्मिती केली आहे. तरुणांना त्यांचं वेगळच आकर्षण आहे. आता ‘बिग बॉस’प्रेमींवर आपली छाप पाडायला तो सज्ज आहे. प्रोमोमध्ये,’बिग बॉस’ म्हणत आहेत,”बिग बॉस मराठीच्या घरात आले आहेत DJ Kratex”. त्यानंतर घरातील सर्वच सदस्य DJ च्या तालावर कल्ला करताना दिसत आहेत.

‘बिग बॉस’ पुढे म्हणत आहेत,”आज होणार आहे या सीझनचं मिड वीक एव्हिक्शन..” त्यामुळे शेवटच्या आठवड्यापर्यंत पोहोचलेल्या कोणत्या सदस्याचा प्रवास आज संपणार याकडे आता ‘बिग बॉस’प्रेमींचं लक्ष लागलं आहे.

जखमी वाघीण जान्हवी किल्लेकरची गोष्ट

बिग बॉसच्या घरातील सदस्य घराबाहेर येत फॅन्सच्या उपस्थिती जोरदार ग्रँड सेलिब्रेशन करताना दिसत आहेत. यावेळी बिग बॉस सदस्यांना त्यांच्या आतापर्यंतच्या प्रवासाची झलक दाखवत आहेत. फॅन्सच्या उपस्थितीमुळे सदस्य भावूक झालेले दिसून येत आहेत. ‘बिग बॉस मराठी’च्या समोर आलेल्या प्रोमोमध्ये,बिग बॉस म्हणत आहेत,”ही कथा आहे एका जखमी वाघिणीची… अनेकदा मनाने तुटूनसुद्धा, अनेक वार पचवूनसुद्धा शेवटपर्यंत अभेद्य राहिलेल्या जान्हवी किल्लेकरची”.

Bigg Boss Marathi: बिग बॉसच्या घरात अभिजीतने मांडले सुरज विषयी स्पष्ट मत

बिग बॉस’प्रेमींना आज पाहायला मिळणार जखमी वाघीण जान्हवी किल्लेकरची गोष्ट. ‘बिग बॉस मराठी’चा शेवटचा आठवडा सुरू असून ग्रँड सेलिब्रेशनच्या माध्यमातून बिग बॉसने सदस्यांना आणि चाहत्यांना खास सरप्राईज दिलं आहे. आजचा भाग कसा असेल याकडे आता प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube