Jayant Patil : आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) निष्ठावान संवाद दौरा करत आहे. आज जयंत पाटील जालन्यात होते. यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजनेवर (Ladki Bahin Yojana) टीका करत राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे.
यावेळी जयंत पाटील म्हणाले, विधानसभा निवडणूक (Assembly Elections 2024) लक्षात घेत राज्य सरकार रोज सकाळी एक घोषणा करत आहे. आता येत्या काही दिवसात लाडके काका, लाडकी काकी योजना येणार आहे. त्यांनी लाडकी बहीण योजना आणली आहे. पण आमचे एकच म्हणणे आहे लाडकी बायको योजना आणा तिच्यावर अन्याय का? असं म्हणत जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर टीका केली.
तसेच तिजोरीत किती आर्थिक बळ आहे याचा हिशोब न करता पाहिजे त्या घोषणा दुर्दैवाने सुरू आहे आणि येत्या दोन तीन महिन्यात राज्य सरकारकडून असल्या फसव्या घोषणा जोरात होणार आहे असं देखील यावेळी जयंत पाटील म्हणाले.
तर पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले, राज्यात दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. आमच्या माऊलीला घर चालवणं मुश्किल झालं आहे. गेल्या दहा वर्षात ज्यांनी अर्थसंकल्प मांडला त्यांना नऊ वर्षात लाडके बहीण योजना आठवली नाही का? असा सवाल देखील त्यांनी या वेळी उपस्थित केला. लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर राज्य सरकारला या योजना आठवायला लागल्या असेही यावेळी जयंत पाटील म्हणाले.
काही दिवसापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यात लाडकी बहीण सारखे योजना सुरु ठेवण्याचे असेल तर आम्हाला निवडून द्या असं म्हणाले होते. यावर उत्तर देत जयंत पाटील म्हणाले की, राज्यातील जनतेला भिती दाखवण्याची गरज नाही. महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर यापेक्षा पुढे जाऊन जनतेला मदत करणार . राज्यात रोजगार कमी होती आहे. त्याला महाविकास आघाडी उत्तर देणार असं जयंत पाटील म्हणाले.
Manoj Jarange Patil : ‘माझा पट्टा तुटला तर मग…’, मनोज जरांगेंचा नारायण राणेंना इशारा
अमित शहांना उत्तर
भाजपच्या महासंमेलनात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शरद पवार भ्रष्टाचाराचे सरदार आहे असं म्हटले होते. यावर उत्तर देत जयंत पाटील म्हणाले, राज्यात दुसरे साहेब येऊन म्हणले शरद पवार हे सगळ्या भ्रष्टाचाराचे सरदार आहेत, हे सगळे सरदार इतके आवडले की तुम्ही ते तुमच्या सोबत घेऊन गेलात अशी टीका यावेळी जयंत पाटील यांनी अमित शहा यांच्यावर केली.