Download App

शरद पवार यांच्या स्क्रिप्टेड प्रोग्राममधील जरांगे हा फक्त बाहुला; हाकेंचा घणाघात

Lakshaman Hake यांनी आरक्षणावरील सर्वपक्षीय बैठकीला शरद पवारांच्या गैरहजेरीवर टीका केली.

Lakshaman Hake on Sharad Pawar and Manoj Jarange : शरद पवार यांच्या स्क्रिप्टेड प्रोग्राममधील जरांगे हा फक्त बाहुला आहे. तसेच पवार साहेब हे दरबारी राजकारण करतात वतनदार सरदार यांच्या टोळीचे प्रमुख शरद पवार आहेत. अशी टीका ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके (Lakshaman Hake) यांनी केली ते आजच्या शरद पवारांच्या पत्रकार परिषदेवर बोलत होते. ज्यामध्ये पवारांनी आरक्षणावरील बैठकीमध्ये आपण जरांगे आणि हाकेंसोबत सरकार काय बोलत हे मला माहिती नाही म्हणून गेलो नसल्याचं म्हटलं होत.

12 नक्षलवाद्यांचा खात्मा; गडचिरोली पोलिसांना 51 लाखांचं बक्षीस, फडणवीसांची घोषणा

यावेळी बोलताना हाके म्हणाले की, पवार साहेब सरकारची आणि जरांगे पाटील असतील किंवा वडीगोद्रीतील आमचा आंदोलन असेल याची चर्चा माध्यमांच्या माध्यमातून संपूर्ण राज्य पाहत होतं ती चर्चा तुमच्यापर्यंत कशी पोहोचले नाही हे न उघडलेलं कोड आहे.पवार साहेब तुम्ही भूमिका घ्यावी. महाराष्ट्रातला ओबीसी तुम्हाला महाराष्ट्र बाहेर देशातील नेतृत्व म्हणून पाहात आहे.

शेवटी ते वारीला आलेच नाहीत, रामकृष्ण हरीचा जयघोष रुचलाच नसता; BJP ची राहुल गांधी अन् पवारांवर टीका

तसेच ते एका मेंढपाळाच्या पोराचं नाव शरद पवार कशाला घेतील. पवार साहेब हे दरबारी राजकारण करतात वतनदार सरदार यांच्या टोळीचे प्रमुख शरद पवार आहेत. उठता बसता शरद पवार यांच्या तोंडात फुले शाहू आंबेडकर पुरोगामी महाराष्ट्र हे नाव असतं म्हणून आम्ही त्यांच्याकडून अपेक्षा करतो. ठीक आहे पवार साहेबांनी नाव नाही घेतलं तरी सत्य आणि संविधानिक चौकट, सामाजिक न्यायाचे धोरण याबाबतीत आम्ही आवाज उठवणार आहोत. शरद पवारांकडून आता आम्ही अपेक्षा सोडलेल्याच आहेत.

जरांगे हा फक्त बाहुला आहे. शरद पवार यांचा हा स्क्रिप्टेड प्रोग्राम आहे. शरद पवार यांनी नाव नाही घेतलं तरी महाराष्ट्रातील अठरापगड जातीतील अलुते बलुते ओबीसी कोणाचं नाव घ्यायचं आणि कुणाचं नाही घ्यायचं हे आता निश्चित ठरवेल. छगन भुजबळ हे शरद पवार यांच्या भेटीला जाण्यापूर्वीच आम्ही खूपदा विचारलं होतं की जाणते राजे कुठे आहेत पुरोगामी नेते कुठे आहेत फुले शाहू आंबेडकरांचे नाव घेणारे शरद पवार कुठे आहेत पण आज शरद पवारांनी त्यांची मनोवृत्ती दाखवून दिली. असं हाके म्हणाले.

follow us