Download App

सुप्रीम कोर्टाचे राहुल नार्वेकरांवर पुन्हा ताशेरे : 30 ऑक्टोबरला शेवटची संधी

Rahul Narwekar : येत्या 30 ऑक्टोबरपर्यंत आमदार अपात्रता सुनावणी प्रकरणाचे नवीन वेळापत्रक सादर करा, ही शेवटची संधी असणार आहे. त्यानंतर आम्ही वेळापत्रक देऊ, असा स्पष्ट इशारा सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रेबाबतची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे. यावेळी न्यायालयाने हा इशारा दिला.

Maharashtra Politics: ‘राहुल नार्वेकर चोरांचे सरदार म्हणून…; संजय राऊतांनी डिवचले

मागील सुनावणीत नार्वेकर यांना आज वेळापत्रक सादर करण्यात न्यायालयाने सांगितले होते. आज सुधारित वेळापत्रक न दिल्याने आम्ही आदेश देऊ असं सरन्यायाधीशांनी म्हटलं होतं. मात्र आजच्या सुनावणीतही अध्यक्षांनी नवीन वेळापत्रक न दिल्याने कोर्टाने नाराजी व्यक्ती केली. यानंतर विधानसभा अध्यक्षांकडून वेळ मागून घेण्यात आला. त्यावर शेवटची संधी म्हणून सर्वोच्च न्यायालयाने 30 ऑक्टोबरपर्यंत नवीन वेळापत्रक सादर करण्याचे आदेश देत पुढील सुनावणी 30 ऑक्टोबरला घेणार असल्याचे सांगितले.

संजय राऊत सुप्रीम कोर्ट आहे का ? नार्वेकरांचं राऊतांना खोचक उत्तर

सुप्रीम कोर्टात काय घडले?

विधानसभा अध्यक्ष कोर्टाच्या निर्णयाचे पालन करत नाहीस असं म्हणतं अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर कोर्टाने नाराजी व्यक्त केली. यावेळी सरन्यायाधीशांनी 10 व्या सूचीचे वचन करुन दाखवले. 11 मे नंतर अध्यक्षांनी काही कार्यवाही केली नाही असं सरन्यायाधीशांनी म्हटलं. विधानसभा अध्यक्ष हे घटनात्मक पद असले तरी सुप्रीम कोर्ट त्यांना आदेश देऊ शकते असं सरन्यायाधीशांनी सांगितले. त्यावर दसरा दरम्यान विधानसभा अध्यक्षांसोबत बसून वेळापत्रक बनवू असं विधानसभा अध्यक्षांच्या वकिलांनी कोर्टात सांगितले. त्यामुळे पुढील सुनावणी 30 ऑक्टोबरला होणार आहे.

Tags

follow us