Download App

Eknath Shinde : शिंदे आणि ठाकरे गटाचे नेते आले एकत्र, पण…

औरंगाबाद : औरंगाबादकरांसाठी प्रजासत्ताक दिन हा दिवस विशेष ठरला आहे. कारण सहा महिन्यांपूर्वी बंड करून शिवसेनेतून वेगळे झालेले शिंदे गटाचे नेते आणि ठाकरे गटाचे पून्हा एकदा मांडीला मांडी लावून बसल्याचं पाहायला मिळालं. निमित्त होत प्रजासत्ताक दिनाचं. या कार्यक्रमात शिंदे गटाचे संजय शिरसाठ आणि ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे शेजारी-शेजारीच बसलेले पहायला मिळाले.

सहा महिन्यांतील सत्तासघर्षांच्या घडामोडी पाहता हे चित्र पाहून लोकांना धक्काच बसला. शेजारी-शेजारीच बसलेले असले तरी या दोन्हीही नेत्यांनी तोंडातून चकार शब्दही काढला नाही. शिंदे गटाचे संदीपान भूमरे हे पालकमंत्री असल्याने ते प्रथेप्रमाणे मान्यावरांना शुभेच्छा देण्यासाठी आले. मात्र त्या आधीच ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे शुभेच्छा न घेताच या ठिकाणाहून निघून गेलेले होते.

यावेळी पत्रकारांनी खैरे यांना शुभेच्छा न घेताच जाण्याबद्दल विचारलं असता ते म्हणाले की, ‘ते घटनाबाह्या आहे ते, नाही थांबणार शुभेच्छा घ्यायला प्रोटोकॉल कसला ?’ असं ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे यावेळी म्हणाले.

त्यावर शिंदे गटाचे नेते आणि पालकमंत्री संदीपान भूमरे म्हणाले की, ‘घटनाबाह्या पालकमंत्री असं म्हणून खैरे यांनी हा अपमान केला आहे. ते काय सुप्रीम कोर्ट आहेत का ? खैरे काहीही बोलतात सध्या जे चालंल आहे हे त्यांना सहन होत नाही. या आधी देखील ते ध्वजारोहन होण्याआधीच ते निघूल गेलेले आहेत त्यांना ती सवय आहे.’

यावेळी ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी हा प्रसंग सांभाळून घेतला. त्यामुळे सहा महिन्यांपूर्वी बंड करून शिवसेनेतून वेगळे झालेले शिंदे गटाचे नेते आणि ठाकरे गटाचे पून्हा एकदा मांडीला मांडी लावून बसल्याचं पाहायला मिळालं असलं तरी त्यांच्यातील कटूता मात्र संपल्याचं काही दिसत नाही. असंच या कार्यक्रमातून पहायला मिळालं.

Tags

follow us