Legislative Council Deputy Chairman Tussle within Shiv Sena two other names in discussion with Nilam Gorhe राज्याच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. यात विधानपरिषद उपसभापतीपदाची निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. यासाठी 1 जुलैला मतदान पार पडणार आहे.दरम्यान विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी महायुतीत हालचालींना वेग आला आहे. माजी उपसभापती नीलम गोऱ्हे यांचे नाव प्रमुख दावेदार म्हणून चर्चेत असले, तरी अंतिम क्षणी वेगळा निर्णय होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. यामध्ये आणखी दोन नावांची चर्चा सुरू आहे. त्यामुळे शिंदे गटाकडून नेमका कोणता चेहरा पुढे येणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.
WhatsApp चं यूजरनेम बुकिंग सुरू; आता नंबरशिवाय करता येणार चॅटिंग, वाचा डिटेल्स
निवडणूक कार्यक्रमानुसार, 30 जून रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत इच्छुक उमेदवारांना नामनिर्देशन अर्ज दाखल करता येणार आहेत. त्यानंतर दुपारी 1 वाजता अर्जांची छाननी होईल. माघारीची वेळ संपल्यानंतर आवश्यक असल्यास 1 जुलै रोजी मतदान घेतले जाईल. मात्र एकच उमेदवार मैदानात राहिल्यास निवड बिनविरोध होण्याची शक्यता आहे. मात्र यामध्ये आणखी दोन नावांची चर्चा सुरू आहे. त्यामुळे शिंदे गटाकडून नेमका कोणता चेहरा पुढे येणार? यामुळे या निवडणूकीमध्यो चूरसीची शक्यता वाढली आहे.
30 जूनची मुदत उलटल्याने शेतकरी कर्जमाफीला नवी डेडलाईन; कृषीमंत्री भरणेंची मोठी माहिती
या नावांमध्ये माजी उपसभपती राहिलेल्या गोऱ्हे यांच्या कृपाल तुमाने आणि चंद्रकांत रघुवंशी यांचा समावेश आहे. यातील रघुवंशींसाठी उत्तर महाराष्ट्रातील 9आमदारांनी एकनाथ शिंदेंना पत्र दिले आहे. त्यामुळे आता शिंदे या आमदारांची चंद्रकांत रघुवंशी यांना उपसभापति करण्याची मागणी लक्षात घेतात की, नेहमी प्रमाणे नवं काही धक्कातंत्र वापरून वेगळेच आमदार उपसभापतीपदी दिसणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे कारण यामध्ये मनीषा कायंदे यांच्या नावाची देखील चर्चा आहे.
