Shivajirao Adhalarao Patil : राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटलांशी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लेट्सअप मराठीच्या चर्चेत अनेक विषयांवर मनमोकळा संवाद साधला. यावेळी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतून शिवाजीराव आढळराव पाटील लोकसभेच्या मैदानात आहेत. यावेळी बोलताना, आढळराव पाटलांनी 2019 ते 2024 या काळात शिरूरला खासदारच नव्हता असा गजब दावा केला आहे. तसंच, आपण कधी आणि काय काम केली याचा पाढाच त्यांनी यावेळी वाचला. लेट्सअप मराठीचे संपाद योगेश कुटे यांनी आढळराव पाटलांनी चर्चे केली. त्यावेळी राजकारणासह अनेक विषयांवर आढळराव पाटील मनमोकळ बोलले आहेत.
मी गॅरंटी देतो
चाकण चौकासह पुणे नगर रोडवरील ट्रॉफीकवर आपल्याला मार्ग काढता का आला नाही असा प्रश्न विचारताच, आढळराव पाटलांनी आपण काय केल याचा पाढाच वाचून दाखवला. ते म्हणाले या रोडसाठी मी 2008 ते 2018 असे सलग 10 वर्ष प्रयत्न केले आहेत. यासाठी तत्कालीन मंत्री सीपी जोशी यांची भेट घेऊन मी या रस्त्यासाठी त्यांच्याशी बोललो आणि काम करून घेतलं. यावेळी नाव न घेता आढळराव पाटलांनी विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांच्यावर जोरदार टीका केली. दरम्यान, चाकण येथील राष्ट्रीय मार्गासाठी 2017 ला टेंडरही निघालं होत. 1200 कोटी रुपयांचं हे टेंडर होत असंही आढळराव पाटलांनी सांगितलं. मात्र, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने अचानक काही कारण देऊन हे टेंडर थांबवल अन्यथा हा रोड त्याचवेळी झाला असता असा दावाही आढळराव पाटलांनी यावेळी केला. तसंच, यावेळी चाकण कुरळी या रस्त्यासाठी मला फक्त दोन वर्ष द्या. नाशिक फाट्यावरून मंचर किंवा आळेफाट्याला फक्त अर्ध्या ते पाऊन तासात जाता येईल याची मी गॅरंटी देतो असंही आढळराव पाटील यावेळी म्हणाले आहेत.
आढळराव पाटलांचा ड्रीम प्रोजेक्ट काय आहे
पुणे नाशिक वेगवान रेल्वे मार्ग हा माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे असं आढळराव पाटलांनी सांगितलं. या मार्गासाठी मी 2012 पासून अनेकदा प्रयत्न केले. मात्र, या मार्गावरून रेल्वे सुरू करण्याला पाहीजे त्या प्रमाणात उत्पन्न मिळणार नाही असा अहवाल समोर आल्याने तो प्रोजक्ट प्रलंबित राहीला. त्यावर 2014 ला सुरेश प्रभू यांच्या कार्यकाळातही मी प्रयत्न केले. त्यासाठी या भागात किती महत्वाचं उत्पन्न आहे. त्याची बाजारपेठ मध्य भारतात असून, तिकडे हा माल जाईल असं पटवून दिलं. त्यानंतर डीपीआर मंजूर करण्यापर्यंत काम केलं असा दावा आढळराव पाटलांनी केला. मात्र, 2014 नंतर या शिरूर मतदार संघाला खासदारच नव्हता असं म्हणत मोठा घणाघात आढळराव पाटील यांनी यावेळी अमोल कोल्हे यांच्यावर नाव न घेता केला.
अर्थ चुकीचा काढला
मी तीन वेळा खासदार झालो. परंतु, तो असाचं नाही. रोजचे दौऱ्याचे वेळापत्रक पाहिलं तर मी जिल्ह्यातील कोणताच भाग नाही जिथं मी गेलो नाही. त्या काळात खासदार काय, खासदार निधी काय, खासदाराची कामं काय हे सगळं कित्येक लोकांना माहिती नव्हत ते माहिती झालं. आणि त्याचमुळे मी तिनवेळा निवडून आलो असंही आढळराव पाटील यांनी सांगितलं. दरम्यान, पवारांच्या विरोधातही मी लढणार का ? अशी चर्चा सुरू होती. त्यावेळी हा माझ्या हक्काचा मतदारसंघ असल्याने मी पवारच काय ओबामा आले तरी मी निवडणूक लढवणार असं म्हणालो होतो. परंतु, त्याचा अर्थ चुकीचा काढला. असं स्पष्टीकरणही आढळराव पाटलांनी दिलं आहे.
इतक्या दिवस अजित पवारांसोबत नव्हतो याचं दु:ख
राष्ट्रवादीच्या नेत्यांशी आपली मैत्री झाली का? असं विचारलं असता आढळराव पाटील म्हणाले, माझ्या राजकारणाची सुरूवातच या लोकांशी झाली. त्यामध्ये दिलीप वळसे पाटील, अजित पवार यांची जेव्हा राजकारणाची सुरूवात झाली त्याच काळात माझी राजकारणाला सुरूवात झाली आहे. तसंच, अजित पवारांशी गेल्या 4 महिन्यांत जो संपर्क आला त्यावरून वाटतं या माणसासोबत आपण इतक्या दिवस का नव्हतो असं म्हणत आढळराव पाटलांनी अजित पवारांशी सोबत नसल्याबद्दल खंत व्यक्त केली. तसंच, अजित पवार हा खुल्या दिलाचा, सरळ मनाचा माणूस आहे अशा शब्दांत आढळराव पाटलांनी अजित पवारांचं कौतुकही केलं.
माझं सुख-दु:ख समजून घेतलं
आपण किती मतांनी निवडून येणार असं विचारलं असता, मी काहीही दावा करणार नाही. मात्र, मी नक्की बहुमताने निवडून येणार असा दावा करत जरी एकदा पराभव झाला असला, तरी या लोकांसाठी मी शिरूरला राहतो. आज माझ मुंबईत अमेरिकेत घर आहे. हे सगळं सोडून मी मुंबईत किंवा अमेरिकेत राहू शकलो असतो. परंतु, या लोकांनी मला 15 वर्ष निवडून दिलं. त्यांनी माझं सुख-दु:ख समजून घेतलं. मी का त्यांना सोडू असं म्हणत आपण आपल्या लोकांसोबत राहणार असल्याचंही यावेळी आढळराव पाटलांनी सांगितलं.
सेमीकंडक्टर आवडता विषय
यावेळी बोलताना आढळराव पाटलांनी सेमीकंडक्टर हा आपला आवडता विषय असल्याचं सांगितलं. सेमीकंडक्टर ही अशी उपकरणे आहेत ज्यात कंडक्टर आणि इन्सुलेटर यांच्यामध्ये वहन असते आणि ते दैनंदिन जीवनात ट्रान्झिस्टर, झेनर डायोड, सोलर पॅनेल, स्विचेस, इलेक्ट्रिक सर्किट्स इत्यादी अनेक उपकरणांमध्ये वापरले जातात. या विषयातील अगदी बारकावेही आढळराव पाटलांना माहिती आहेत.