शिवाजीरावांना आस्मान दाखवलं! शिरुरमध्ये 1 लाखांच्या लीडने पुन्हा अमोल कोल्हेच…

शिवाजीरावांना आस्मान दाखवलं! शिरुरमध्ये 1 लाखांच्या लीडने पुन्हा अमोल कोल्हेच…

Shirur Loksabha : शिरुर लोकसभा (Shirur Loksabha) मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी महायुतीचे उमदेवार शिवाजीराव आढळराव पाटलांना (Shivajirao Adhalrao Patil) आस्मान दाखवलंय. महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी 1 लाख 36 हजार 744 मतांची आघाडी घेत विजय मिळवलायं. तर शिवाजीराव आढळऱाव पाटलांना एकूण 6 लाख 79 हजार 934 मते मिळाली आहेत. दरम्यान, निवडणूक आयोगाकडून अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, अमोल कोल्हे यांचाच विजय झाल्याचं निश्चित मानलं जात आहे.

TMC चं एक्झिट पोलला सडेतोड उत्तर; पाहा पश्चिम बंगालमध्ये ममतांच्या कोण-कोणत्या उमेदवारांनी मारली बाजी

शिरुर लोकसभा मतदारसंघात सुरुवातीपासूनच नवनवीन ट्विस्ट दिसून आले होते. या मतदारसंघातील विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांच्यात आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात चांगलेच घमासान सुरु होते. शिरुरमधून शिवाजीराव आढळराव पाटील खासदारकीसाठी आग्रही होते. मात्र ते शिंदे गटाचे नेते असल्याने ही जागा शिंदे गटाला मिळणार की नाही? याबाबत शंकाकुशंका व्यक्त केली जात होती. यावर अजितदादांनी तोडगा काढत शिवाजीराव आढळरावांचा राष्ट्रवादीत पक्षप्रवेश करुन घेत अमोल कोल्हेंना शिरुरमधून आव्हान दिलं होतं.

उत्तर-मध्य मुंबईत उज्ज्वल निकमांना धक्का! अटीतटीतच्या लढतीत वर्षा गायकवाडांनी मारली बाजी

राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर शिवाजीरावच शिरुरमध्ये महायुतीचे उमेदवार असणार असल्याचं स्पष्ट झालं होतं. या संपूर्ण घडामोडींमध्ये अजित पवार यांनी प्रचारादरम्यान, जाहीर सभांमधून शरद पवारांसह अमोल कोल्हे यांच्यावर सडकून टीका केल्याचं पाहायला मिळालं होतं. एवढचं नाही तर अमोल कोल्हे यांचा अभिनय, डॉक्टरकीची पदवी यांसह इतर मुद्द्यांवरुन त्यांनी हल्लाबोल केल्याचं दिसून आलं. अजितदादांच्या टीकेनंतर अमोल कोल्हे यांनीही पुढे सरसावत शिवाजीरावांसह अजितदादांवर टोलेबाजी केली होती.

Lok Sabha Election Results: सिंधुदुर्गमध्ये नारायण राणे 12 हजार मतांनी पुढे, विनायक राऊतांची पिछाडी कायम

दरम्यान, अखेर शिरुरमधून यंदा शिवाजीराव आढळराव पाटील यांना निवडून आणण्यासाठी अजितदादांनी चांगलीच रणनीती आखली होती. मात्र, शरद पवार आणि अमोल कोल्हे यांच्या ताकदीपुढे शिवाजीराव आढळराव पाटलांची ताकद कमी पडल्याचं दिसून आलयं. आरोप-प्रत्यारोप,टीका टीप्पणीनंतर अखेर अमोल कोल्हे यांनी शिवाजीरावांचा तब्बल 1 लाख 36 हजार मतांच्या फरकाने पराभव केलायं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube