उत्तर-मध्य मुंबईत उज्ज्वल निकमांना धक्का! अटीतटीतच्या लढतीत वर्षा गायकवाडांनी मारली बाजी

उत्तर-मध्य मुंबईत उज्ज्वल निकमांना धक्का! अटीतटीतच्या लढतीत वर्षा गायकवाडांनी मारली बाजी

LokSabha Election Result Varsha Gaikwad Win Ujjwal Nikam defeat : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी ( LokSabha Election Result ) अद्याप देखील सुरू आहे. त्यात अटीतटीचा सामना झालेल्या उत्तर-मध्य मुंबईत कॉंग्रेसने भाजपला अक्षरशः काटे की टक्कर देत धूळ चारली आहे. भाजपचे उज्ज्वल निकम ( Ujjval Nikam ) यांना कॉंग्रेसच्या वर्षा गायकवाड ( Varsha Gaikwad ) यांनी पराभूत केलं आहे.

अमरावतीत नवनीत राणांचा पराभव, कॉंग्रेसच्या बळवंत वानखडेंनी दाखवला इंगा

मुंबईतील उत्तर मध्य मुंबई हा मतदारसंघ यावेळी चर्चेत राहिला तो म्हणजे 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याच्या हायप्रोफाईल प्रकरणांमध्ये सरकारी वकिलांची भूमिका बजावणारे ज्येष्ठविधीज्ञ उज्ज्वल निकम यांच्या उमेदवारीमुळे. या मतदारसंघामध्ये एकीकडे महावितरण निकम यांना उमेदवारी दिल्यानंतर काहीसं नाराजी नाट्य पाहायला मिळालं होतं. कारण भाजपने विद्यमान खासदार पूनम महाजन यांचे तिकीट कापून निकम यांना मैदानात उतरवलं.

Hatkanangale Loksabha : धैर्यशील मानेंनी गड राखलाच! इचलकरंजीने तारल्याने 40 हजारांचा लीड…

तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली. त्यात देखील काँग्रेस नेते आरिफ नसून खान हे गायकवाड यांना उमेदवारी दिल्याने नाराज झाले होते. या मतदारसंघातील ध्रुवीकरणाचा मुद्दा तो म्हणजे मुस्लिम मतदारांची संख्या जास्त आहे. त्यामुळे या मतदारांच्या फायदा महाविकास आघाडीला झाला हे स्पष्ट झालं आहे. तसेच महायुतीतील अजित पवार गटात सामील झालेले काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या येण्याने हे मुस्लिम मतदान भाजप आणि पर्यायाने महायुतीच्या पारड्यात पडणार असं बोललं जात होतं मात्र ते साफ खोट ठरलं आहे.

Uttar Pradesh Loksabha Election Result : भाजपला धक्काच! उत्तर प्रदेशात ‘सायकल’ सुसाट पळाली…

दरम्यान उज्ज्वल निकम आणि वर्षा गायकवाड यांच्यातील ही लढत मतमोजणाच्या शेवटच्या फेरीपर्यंत अटीतटीची राहिली. पण यामध्ये अखेर कॉंग्रेसच्या वर्षा गायकवाडांनी विजय खेचून आणला. या लढतीत निकम हे केवळ 176 मतांनी पराभूत झाले आहेत. त्यामुळे वर्षा गायकवाडांचा हा विजय अगदी निसटता विजय मानला जात आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube