शिंदेंच्या बागुलांचा वारू भाजपने सातव्या वेळी रोखला; आबा बागुलांचा वाबळेंकडून पराभव
Aaba Bagul Mahesh Wable शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आणि माजी महापौर असलेले आबा बागुल यांचा भाजपच्या महेश वाबळे यांनी पराभव केला आहे.
Shivsena Leader Aaba Bagul Defeat by BJPs Mahesh Wable : राज्यामध्ये पार पडलेल्या 29 महानगरपालिका निवडणुकांचे निकाल आज अखेर स्पष्ट झाले आहेत. त्यामध्ये अनेक ठिकाणी नवख्यांना संधी तर दिग्गजांना धक्का बसला आहे. त्यामध्ये अशीच एक प्रतिष्ठेची लढत राहिली ती म्हणजे पुणे महानगरपालिका निवडणूक. येथील प्रभाग क्रमांक 36 मध्ये तब्बल सहा वेळा निवडणूक जिंकून नगरसेवक राहिलेले एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आणि माजी महापौर असलेले आबा बागुल यांचा भाजपच्या महेश वाबळे यांनी तब्बल 4000 मतांनी पराभव केला आहे.
धंगेकरांना पराभवाचा तिसरा धक्का; कोमकर हत्याप्रकरणात जेलमध्ये असलेल्या सासू व सुना विजयी
त्यामुळे आता बागुल यांचं नगरसेवक होण्याच्या स्वप्न भंग झालं आहे. आता बागुल हे दिग्जज होते. तर वाबळे यांचीही दुसऱ्यांदा निवडणूक लढवण्याची वेळ होती. ते दुसऱ्यांदाही जिंकले आहेत. 2017 मध्ये वाबळे यांनी विजय संपादन केला होता. त्यावेळी त्यांचा प्रभाग हा पर्वती विधानसभा मतदारसंघात येतो. या ठिकाणी भाजपचं कायम वर्चस्व राहिलं आहे. दुसरीकडे याच प्रभागामध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुभाष जगताप तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे माजी स्थायी समिती अध्यक्ष अश्वीनी कदम यांचाही पराभव झाला आहे.
पवारांना सोडणाऱ्या प्रशांत जगतापांचा विजय
पुण्यामध्ये राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणामुळे पवारांना सोडून काँग्रेसमध्ये गेलेल्या प्रशांत जगतापांचा विजय झाला आहे. भाजपाच्या विरोधात प्रशांत जगताप जिंकले आहेत. माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांचा मुलगा अभिजीत शिवरकर हे ऐनवेळी काँग्रेसमधून भाजपा मधे गेले होते… त्याच भाजपाच्या अभिजित शिवरकर यांचा प्रशांत जगताप यांनी केला पराभव प्रशांत जगतापांच्या विजयाने पुण्यात काँग्रेसनं खातं खोललं आहे. प्रशांत जगताप यांनी विजय खेचून आणला आहे.
