Lok Sabha Election 2024 : देशात सध्या लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Election) वारे वाहत आहे. आतापर्यंत देशात तीन टप्प्यात मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे तर 13 मे रोजी चौथ्या टप्यासाठी मतदान होणार आहे. मात्र त्यापूर्वी देशातील राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे.
या बातमीनुसार उद्या इंडिया आघाडीचं (India Alliance) शिष्टमंडळ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांची भेट घेणार आहे. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी याबाबत माहिती दिली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कामकाजांवर निर्माण झालेल्या संशयावरून इंडिया आघाडीचं शिष्टमंडळ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार आहे.
देशात तीन टप्प्यात मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे मात्र त्यानंतर मतदानाची टक्केवारी वाढल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. या आरोपांवरुन शिष्टमंडळ राष्ट्रपतींची भेट घेणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली.
प्रकरण काय?
गेल्या काही दिवसांपासून विरोधकांसह सोशल मीडियावर देखील निवडणूक आयोगाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. मतदानाच्या टक्केवारीत तफावत कशी? असं प्रश्न आता विरोधक निवडणूक आयोगाला विचारात आहे. या प्रकरणात तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून या संदर्भात स्पष्टीकरणाची मागणी देखील केली आहे.
19 एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यात मतदान पार पडलं होतो. त्यादिवशी संध्याकाळपर्यंत सरासरी 60 टक्के मतदान झालं असल्याची माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली होती. मात्र दुसऱ्या टप्प्यासाठी 26 एप्रिलला मतदान पार पडलं या दिवशी पहिल्या टप्प्यात सरासरी 61 टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली त्यानंतर 30 एप्रिलला निवडणूक आयोगाने सुधारित आकडेवारी जाहीर करत 66 टक्के मतदान झाल्याची माहिती दिली. मात्र नवीन आणि जुन्या आकडेवारीत तब्बल 6 टक्क्यांचा फरक आल्याने विरोधकांकडून निवडणूक आयोगाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.
T20 World Cup 2024: भारीच, फ्रीमध्ये पाहता येणार टी20 वर्ल्ड कप सामने; जाणून घ्या कसं
यावेळी निवडणूक आयोगाने किती टक्के मतदान झालं याची आकडेवारी जाहीर केली आहे मात्र कोणत्या मतदारसंघात किती मतदान झालं याची आकडेवारी निवडणूक आयोगाने जाहीर केलेली नाही. यामुळे काँग्रेससह इतर विरोधक निवडणूक आयोगाला प्रश्न विचारात आहे.