हा तर लोकशाहीवर हल्ला, विरोधी पक्षाच्या मुख्यमंत्र्यांना जाणूनबुजून टार्गेट; ममता बॅनर्जीचा हल्लाबोल
Mamata Banerjee : आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना मद्य धोरण प्रकरणात ईडीने (ED) गुरुवारी रात्री त्यांच्या निवासस्थानातून अटक केली. त्यांच्या अटकेनंतर देशातील राजकीय वातावरण तापले असून, विरोधकांकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी भाजपवर हल्लाबोल करत हा लोकशाहीवर हल्ला असल्याचं म्हटलं आहे.
पंतप्रधानांवरील टीका संजय राऊतांना भोवणार ? भाजपची निवडणूक आयोगात धाव
ममता बॅनर्जी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर एक पोस्ट लिहिली. त्यात त्यांनी लिहिलं की, जनतेने निवडून दिलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेचा मी तीव्र शब्दात निषेध करते. मी माझा पाठिंबा दर्शवण्यासाठी आणि एकजूट वाढवण्यासाटी सुनीता केजरीवाल यांच्याशी संपर्क साधला आहे. निवडून आलेल्या विरोधी मुख्यमंत्र्यांना जाणूनबुजून टार्गेट करून अटक केली जात आहे. सीबीआय, ईडीच्या फेऱ्यात अडकलेले नेते भाजपसोबत गेल्यानंतर त्यावर पांघरून घातले जाते. हे संतापजनक आहे. हा लोकशाहीवर केलेला हल्ला आहे.
‘देशात हजारो कोटींचे घोटाळे होतात पण..; ‘आप’ नेत्याचे अण्णा हजारेंना जोरदार प्रत्युत्तर
ममता पुढे म्हणाल्या, ‘आमची इंडिया आघाडी निवडणूक आयोगाला भेटून विरोधी पक्षांच्या नेत्यांना मुद्दाम लक्ष्य करणं आणि अटक करण्यावर तीव्र आक्षेप व्यक्त करणार आहे. यासाठी आयोगासोबतच्या या महत्त्वाच्या बैठकीत तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन आणि नदीमुल हक पक्षाचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
तर अण्णा हजारे म्हणाले की, केजरीवाल यांच्यासारखी व्यक्ती माझ्यासोबत पूर्वी काम करायची. तेव्हा आम्ही दारूच्या विरोधात आवाज उठवायचो. पण आता ते दारू धोरण बनवत आहेत. याबद्दल मला खूप दुःख झाले आहे. पण काय करणार? सत्तेच्या पुढं शहाणपण चालत नाही. केजरीवाल यांना दारू धोरण प्रकरणात अटक झाली असेल तर हे सर्व त्यांच्या कृत्यांमुळे झालं, अशी प्रतिक्रिया अण्णा हजारे यांनी दिली आहे.
केजरीवाल यांच्यावरील कारवाईमुळे आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते चांगलेच भडकले आहेत. राजधानी दिल्लीत आज या अटकेविरोधात आप कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयासमोर आंदोलन केले. यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांत धक्काबुक्की झाल्याची माहिती आहे. या प्रकरणीत पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.