‘देशात हजारो कोटींचे घोटाळे होतात पण..; ‘आप’ नेत्याचे अण्णा हजारेंना जोरदार प्रत्युत्तर

‘देशात हजारो कोटींचे घोटाळे होतात पण..; ‘आप’ नेत्याचे अण्णा हजारेंना जोरदार प्रत्युत्तर

Arvind Kejriwal Arrest : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal ) यांना अटक करण्यात आली आहे. दारू घोटाळ्याप्रकरणी ईडीने त्याच्यावर मोठी कारवाई केली आहे. सलग नऊ समन्सकडे दुर्लक्ष केल्याने केजरीवाल यांना अटक होऊ शकते अशी चर्चा राजकीय वर्तुळात आधीपासूनच होती. ईडीच्या या कारवाईचा विरोधकांनी निषेध करत केंद्र सरकारवर तुफान टीका केली. तर दुसरीकडे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी (Anna Hajare) मात्र अरविंद केजरीवाल यांनाच फटकारे लगावले. अण्णा हजारे यांनी केजरीवालांच्या अटकेला त्यांच्या कृतीचं फळ असल्याचं म्हटलं होतं. त्यांच्या याच वक्तव्यावर आम आदमी पार्टीचे नेते विजय कुंभार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

विजय कुंभार यांनी एक्सवर एक पोस्ट लिहीली आहे. अरविंद केजरीवाल यांच्या अटकेसंदर्भात अण्णा हजारे यांनी केलेले “त्यांच्या कर्माने जेलमध्ये गेले” हे वक्तव्य दुर्दैवाचे आणि बेजबाबदारपणाचं आहे. कोणतीही माहिती न घेता केवळ ऐकीव माहितीवर विसंबून अण्णांसारख्या व्यक्तीने काहीतरी सार्वजनिक वक्तव्य करणे योग्य नाही.

Arvind Kejriwal यांची अटक म्हणजे त्याचं कर्म; अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया

देशात आणि राज्यात शेकडो हजारो कोटींचे घोटाळ होत आहेत. त्या संदर्भात बातम्या आल्या तरी अण्णा हजारे यांनी मागील काही वर्षात वक्तव्य केले नाही. अण्णांचं वय झालं. त्यांना कमी ऐकू येतं म्हणून कार्यकर्त्यांनी त्यांच्या सध्याच्या निष्क्रियतेकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे अण्णांनी असे काहीतरी एकांगी वक्तव्य करून स्वतःवर टीकेची झोड उठवून घेणे योग्य नाही, असे कुंभार यांनी म्हटले आहे.

केजरीवालच मद्य घोटाळ्याचे किंगपिन : ईडीचा दावा 

ईडीच्यावतीने एएसजी राजू यांनी सांगितले की अरविंद केजरीवाल आम आदमी पार्टीचे प्रमुख आहेत. अबकारी धोरण केजरीवाल, मनिष सिसोदिया आणि संजय सिंह यांच्या माध्यमातून लागू करण्यात आले होते. यामध्ये विजय नायर केजरीवाल यांच्यासाठी काम करत होता. या प्रकरणी मनिष सिसोदिया यांचेही महत्वाचे योगदान होते. सिसोदिया यांचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला होता.

साऊथ लॉबीच्या माध्यमातून आम आदमी पार्टीला 45 कोटी रुपये मिळाले होते. मनिष सिसोदिया यांनी विजय नायरला केजरीवाल यांच्या घरी बोलावले होते आणि अबकारी धोरणासंबंधीचे कागदपत्र दिले होते. विजय नायर अरविंद केजरीवाल आणि के. कविता यांच्यासाठी काम करत असल्याचे ईडीच्या वकिलांनी सांगितले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube