पंतप्रधानांवरील टीका संजय राऊतांना भोवणार ? भाजपची निवडणूक आयोगात धाव

पंतप्रधानांवरील टीका संजय राऊतांना भोवणार ? भाजपची निवडणूक आयोगात धाव

Sanjay Raut : ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊ (Sanjay Raut) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) जोरदार टीका केली. त्यांनी मोदींची तुलना औरंगजेबाशी केली आहे. त्यामुळं भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. भाजप नेत्यांकडून संजय राऊतांवर जोरदारी टीका केली जातेय. अशातच आता भाजपने (BJP) संजय राऊतांविरोधात निवडणूक आयोगा धाव घेतली.

‘माझ्यावर केसेस करुन तडीपार करण्याचा डाव’; मनोज जरांगेंचा दावा 

राऊत यांच्या विरोधात भोईवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून निवडणूक आयोगाकडेही तक्रार करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची औरंगजेबाशी तुलना करून समाजातील एका मोठ्या वर्गाच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.

भाजपचे सचिव विवेकानंद गुप्ता यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं. त्यांनी त्यांनी कायदेशीर कारवाई कण्याची मागणी केली. पत्रात लिहिलं की, संजय राऊत यांनी केलेलं कालचे विधान हे पंतप्रधानांचा अपमान करणारं आहे. बदमानी करणारं आहे. त्याहीपेक्षा संजय राऊतांचे विधाने हे पंतप्रधानांबद्दल विद्वेष पसरवणारं आहे. आणि म्हणून निवडणूक आयोगाला याबद्दल त्याची दखल घ्यायला लावू, विनंती करू आणि त्याबद्दल कायदेशीर कारवाईची अपेक्षा करू, असं म्हटलं.

एक अकेला धनंजय चंद्रचूड क्या करेगा? 

तर आशिष शेलार म्हणाले की, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना याकुब मेमनची कबर सजवली होती, मग याला औरंगजेब मानसिकता म्हणायचे की नाही?, असा खोचक सवाल केला.

राऊत काय म्हणाले?
देशात लोकसभेची रणधुमाळी सुरू झाली. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप करत आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना औरंगजेबाशी केली. औरंगजेबचा जन्म पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गावाजवळ झाला. त्यामुळे दोघांची विचारधारा एकच आहे. राऊत म्हणाले, लफंगेगिरी करून तुम्ही निवडून येता, हेच औरंगजेब करत होता. औरंगजेबाची वृत्ती खा खा होती. कोणीही प्रतिस्पर्धी नसावा आणि प्रत्येकाने आपल्या पक्षात यावे आणि कोणीही समोर असूच नये ही औरंगजेबाची वृत्ती होती, असं म्हणत त्यांनी मोदींची तुलना औरंगजेबाशी केली होती.

दरम्यान, आता भाजपने राऊतांविरोधात निवडणूक आयोगात धाव घेतल्यावर राऊतांवर आयोगाकडून काय कारवाई होते, हेच पाहणं महत्वाचं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube