‘माझ्यावर केसेस करुन तडीपार करण्याचा डाव’; मनोज जरांगेंचा दावा
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरुन राज्याच चांगलच वातावरण तापलं आहे. मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनामुळे आंदोलकांवर पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. अशातच आता मनोज जरांगे (Manoj jarange Patil) यांनी सरकारचा एक मोठा डाव असल्याचा दावा केला आहे. माझ्यावर 10 ते 15 केसेस दाखल करुन तडीपार करण्याचा डाव असल्याचं मनोज जरांगे यांनी सांगितलं आहे.
धंगेकरांना उमेदवारी मिळताच वसंत मोरेंचं ठरलं; हाती ‘हातोडा’ घेऊन अपक्ष मैदानात उतरणार
मनोज जरांगे म्हणाले, प्रणिती शिंदे यांच्यावरील हल्ल्याचं मी समर्थन करीत नाही. या हल्ल्याबाबत मला काहीच माहित नाही. प्रणिती शिंदे यांनी हल्ला केलायं. या हल्ला प्रकरणाबद्दल मला माहित नाही. मला मूळ कारण माहित नाही मराठा असल्याने त्याला दोष देऊ नका कारण काही वेगळंही असू शकतं
शेवटी फडणवीस आणि मुख्यमंत्र्यांना गुन्हेच दाखल करायचे आहेत. परळीत एक लाख लोकं जमू शकतात तर त्याची दखल घेत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी शांततेची भूमिका घेतली पाहिजे, असंही मनोज जरांगे म्हणाले आहेत.
मोठी बातमी : MPSC च्या परीक्षा लांबणीवर; तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांचा हिरमोड
तसेच मला अशी माहिती मिळाली माझ्यावर 10 ते 15 केसेस करुन मला तडीपार करण्याचा डाव आहे , तुम्ही स्वप्न बघायचे बंद करा मला तडीपार करायंच, क्लिप व्हायरल करायंच, मराठा विरोधात गेलायं आता इतर समाजाचे लोकंही विरोधात जात आहे इतका द्वेष चांगला नाही. राज्याचं सर्वात बेस्ट उदाहरण परळीत एक लाख लोकांची बैठक होणार असेल तर हा तुमच्यासाठी मोठा संकेत आहे समजून घ्या, असा इशाराही मनोज जरांगे यांनी दिला आहे.
दरम्यान, मी कोणावरही अन्याय करु शकतो मोठी जात यांना समपवायची आहे अशी भूमिका त्यांची मोठ्या जाती एकत्र आल्या तर राजकीय सुपडा साफ होणार असल्याचंही मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे,.