बुडत्याचे पाय डोहाकडे, फडणवीसांमुळेचं मोदींचा करेक्ट कार्यक्रम होणार; मनोज जरांगेंचा हल्लाबोल

बुडत्याचे पाय डोहाकडे, फडणवीसांमुळेचं मोदींचा करेक्ट कार्यक्रम होणार; मनोज जरांगेंचा हल्लाबोल

Manoj Jarange Patil : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) लढा देत आहे. मात्र, अद्याप मराठा समाजाला सगेसोयऱ्यांचं आरक्षण मिळालं नाही. त्यावरून जरांगे पाटील यांनी सातत्याने सरकाररवर टीका केली. आताही त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadnavis)) जोरदार टीका केली. फडणवीस यांच्या मराठा द्वेषामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आगामी लोकसभा निवडणुकीत करेक्ट कार्यक्रम होईल, असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केला.

निवडणुकी आधी मी शांत बसाव म्हणून ईडीची नोटीस; जप्तीच्या कारवाईनंतर रोहित पवार आक्रमक 

ते म्हणाले, फडणवीस यांच्या दृष्टीने मी मराठा समाज आणि सत्ता याच्यातील काटा आहे. हा काटा काढावाच लागणार, असा पण फडणवीसांनी केला. पण मी देखील तुरुंगात सडायलाही तयार आहे, असे आव्हान जरागेंनी फडणवीसांना दिलं.

मनोज जरांगे हे आज बीडमध्ये माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल केले. यावरून फडणवीसांचा मराठ्यांप्रती असलेला द्वेष दिसून येतो. त्यांना गरीब मराठ्यांचे काम पुढं जाऊ द्यायचं नाही. त्यांच्या पोटात मराठ्यांप्रती किती राग आहे हे दिसून येते. त्यामुळे फडणवीस यांच्याकडून एसआयटीची चौकशी लावण्यात आली. एसआयटी टीम माझ्या डॉक्टरांची चौकशी करत आहे. माझ्यावर जेसीबीतून फुले उधळणाऱ्यांविरुध्द गुन्हे दाखल करण्यात आले. ही देवेंद्र फडणवीसांची सर्वांत मोठा चूक होती, असं जरांगे म्हणाले.

Baramati Agro : साडेतीन लाख लोकांच्या कुटुंबाशी खेळ, ईडीच्या कारवाईनंतर रोहित पवार आक्रमक 

जरांगे म्हणाले, फडणवीस यांची सध्याची वागणूक म्हणजे बुडत्याचे पाय डोहाकडे अशी आहे. फडणवीस मोदी साहेबांचा करेक्ट कार्यक्रम करणार आहेत. माझ्यावर फुलं उधळणाऱ्यांवर गुन्हे का दाखल केले जात आहेत? राज्य सरकार माझ्यावर इतकं का जळतं? देवेंद्र फडणवीस तुमच्या जळण्याने काही होणार नाही. हे वर्तन गृहमंत्र्यांना शोभत नसल्याचे जरांगे पाटील म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांनी आता माझ्याकडून सूड घेण्याचे ठरवले आहे, मी सत्ता आणि मराठा समाज यांच्यातील काटा आहे, असे त्यांना वाटते. हा काटा काढावा लागणार, हा फडणवीसांचा पण आहे. मात्र मी तुरुंगात सडायलाही तयार आहे, असे जरांगे पाटील म्हणाले.

मला जातीत तोलू नका
मला जातीत तोलू नका, फक्त मी मराठा आरक्षणावर बोलतो. राजकारण्यांनी जातीय द्वेष पसरवलाय. आपण सतर्क राहून परिवर्तन केलं पाहिजे. गरीब मराठा समाजाने एकदा पण केला तो पूर्णच करतो. तुम्हाला तुमचा पण पूर्ण करायचं आहे. पण, आम्ही देखील आमचा पण पूर्ण करू, असं जरांगे म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज