Manoj Jarange : ‘मला केव्हाही अटक होऊ शकते’; मनोज जरांगेंचा खळबळजनक दावा

Manoj Jarange : ‘मला केव्हाही अटक होऊ शकते’; मनोज जरांगेंचा खळबळजनक दावा

Manoj Jarange : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange) पुन्हा एकदा राज्य सरकारवर घणाघाती टीका केली आहे. मला अटक करण्याचा डाव असून केव्हाही अटक होऊ शकते. याबाबत अहवाल सुद्धा तयार करण्यात आला आहे. दहा टक्क्यांचे न टिकणारे आरक्षण (Maratha Reservation) मराठा समाजाला देण्यात आले आहे.  यातून सरकारने आमची फसवणूक केली आहे, असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला. बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी हे वक्तव्य केले.

सत्तेचा गैरवापर करून मराठ्यांवर दडपशाही सुरू आहे. सरकारने जाणूनबुजून जे निजामशाही, इंग्रजांनीही केलं नव्हतं त्यापेक्षा जास्त सत्तेचा गैरवापर गोरगरीब मराठ्यांवर केला. परंतु, मराठा समाज मागे हटणार नाही. सरकारने दिवसाढवळ्या फसवणूक केली आहे. आणखी किती दिवस अन्याय करणार आहात हेच आम्ही पाहणार आहोत.

Manoj Jarange : आरक्षण देताच फडणवीस सदावर्तेला याचिका दाखल करायला लावणार; डिस्चार्ज मिळताच जरांगे आक्रमक

काही चौकशी सुरू आहे की नाही हे मला माहिती नाही. कदाचित चौकशी अहवाल तयार झाला असेल. मला अटक करणार हे एकाने सांगितले. कारण, मराठा आणि सत्ता याममधील काटा मी आहे, असे सरकारला वाटते, असा गंभीर आरोप जरांगे पाटील यांनी यावेळी केला. आता आम्ही न टिकणारे दहा टक्के आरक्षण घेत नाही म्हणून आमच्यावर गुन्हे नोंदवले जात आहेत. सरकारने दिलेले हे आरक्षण टिकणारं नाही आणि आम्ही ओबीसीतूनच आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नसल्याची भूमिका त्यांनी पुन्हा मांडली.

आमचेच काही आमदार आहेत जे त्यांना माझी माहिती देत आहेत. त्या आमदारांची नावं आज मी इथं घेणार नाही. पण, असे 36 आमदार तरी आहेत. आज आमच्यावर वेळ आहे. उद्या तुमच्यावरही येणार आहे. पण कितीही दबाव येऊ मराठा एक इंचही मागे हटणार नाही. मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं होतं की गुलालाचा अपमान होऊ देऊ नका. मुख्यमंत्री म्हणतात की आम्ही त्याचा लाड केला पण, उलट आम्हीच त्यांचा लाड केला. तुम्ही आमचा करेक्ट कार्यक्रम केला तर आम्ही करेक्ट कार्यक्रम करत असतो, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला.

Manoj Jarange Patil: ‘संघर्षयोद्धा’ मनोज जरांगे पाटील चित्रपटाचा धमाकेदार टीजर रिलीज

मी कुणालाही त्रास देत नाही. अधिसूचना त्यांनी काढली तर आता त्या अधिसूचनेची अंमलबजावणी करायला हवी. आधीच्या काळात राजा न्याय द्यायचा. आताच्या राजांना दया माया नाही. जनता बिथरली तर काय करणार. आता तर तीन राजे आहेत. एक राजा न्याय देत असेल तर बाकीच्या दोन राजांनी त्याला साथ द्यायला हवी. पण, यांना तर गुलालाचा राग आलाय, असेही जरांगे पाटील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज