Download App

नगरी राजकारण तापलं! विखेंना ताकद देण्यासाठी अजितदादांच्या राष्ट्रवादीचा आज मेळावा

  • Written By: Last Updated:

Lok Sabha election 2024 : नगर दक्षिण मतदारसंघात निवडणुकीचं मैदान तयार झालं आहे. महायुतीचे सुजय विखे यांच्या विरोधात महाविकास आघाडीचा तगडा उमेदवार निलेश लंके यांच्यात लढत.  या लढतीत थेट शरद पवार यांनी लक्ष घातलंय. तर महायुतीनेही स्थानिक नेत्यांचे रुसवे फुगवे निकाली काढत सुजय विखेंंच्या मागे  ताकद उभी करण्याचा चंग बांधलाय. याचीच तयारी सुरू आहे. आज अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा मेळावा त्यासाठीच नगर शहरात होत आहे. या मेळाव्यात प्रचाराची रणनीती ठरणार आहे. मंत्री हसन मुश्रीफ आणि महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह दिग्गज नेते या मेळाव्यात उपस्थित राहतील. 

हा मेळावा आणखी एका अर्थाने खास आहे. निलेश लंके यांनी अजिततदादांना डावलत आमदारकीचा राजीनामा दिला आणि तुतारी हाती घेतली. लंके यांची ही कृती अजितदादांच्या जिव्हारी लागली आहे. त्यामुळे त्यांनीही या निवडणुकीत लक्ष घातल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आजचा हा मेळावा महत्वाचा ठरणार आहे.

संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha election) वारे वाहत आहे. यातच आता नगर दक्षिणेमध्ये देखील राजकीय पक्ष सरसावले आहे. नगर दक्षिण मतदारसंघामध्ये महायुतीकडून (MahaYuti) खासदार सुजय विखे ( Sujay Vikhe) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीकडून (MVA) निलेश लंके (Nilesh Lanke) यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांच्या विजयासाठी आता राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे शिलेदार देखील मैदानात उतरले आहेत. नगर येथे आज राष्ट्रवादीचा मेळावा पार पडत आहे.  या मेळावासाठी कृषीमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यासह आदिती तटकरे (Aditi Tatkare) देखील उपस्थित राहणार आहे.

या मेळाव्याच्या माध्यमातून नगर दक्षिण मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांना शह देण्यासाठी व विखेंना बळ देण्यासाठी राष्ट्रवादी मैदानात उतरली आहे. तर लोकसभेच्या अनुषंगाने लंके यांनी नगर दक्षिण मतदारसंघामध्ये स्वाभिमानी जनसंवाद यात्रा सुरू केली आहे. या यात्रेच्या माध्यमातून ते आपला प्रचार देखील करत आहेत.

तर आता दुसरीकडे पूर्वी अजित पवार गटाचे आमदार असलेले मात्र आता सध्या स्थितीला राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात असलेल्या निलेश लंके यांना शह देण्यासाठी राष्ट्रवादी देखील सरसवली आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून सुजय विखे यांच्याकडून  प्रचाराला सुरुवात झाली आहे.

राहुल गांधींकडे फक्त 55 हजारांची रोकड; स्वतःच घरही नाही

सुजय विखे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर विखे संपूर्ण मतदारसंघ फिरू लागले आहे. तसेच महायुतीचे मित्रपक्ष असलेले राष्ट्रवादी देखील विखेंच्या मदतीला धावली असून आता ठिकठिकाणी मिळावे घेत विखेंना बळ देण्यात येत आहे. लंके यांनी लोकसभेपूर्वी अजित पवार गटाला राम राम ठोकल्याने ही गोष्ट अजित पवारांच्या चांगलीच जिव्हारी लागल्याचं समजतंय. यामुळे विखेंचा प्रवास विजयाच्या दिशेने होण्यासाठी लंकेंना कसा शह दिला जाऊ शकतो यासाठी आता राष्ट्रवादी देखील सरसवली आहे.

follow us

वेब स्टोरीज