India Alliance Meeting : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha elections) निकालानंतर सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आला. एनडीएला (NDA) स्पष्ट बहुमत मिळाले असून त्यांच्याकडून सरकार स्थापनेचा दावा करणार आहेत. दरम्यान, आज इंडिया आघाडीची दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत इंडिया आघाडी (India Alliance) विरोधात बसणार असून सरकार स्थापनेचा प्रयत्न करणार नसल्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
हार्दिक, बुमराह चमकले, भारतीय गोलंदाजांचा कहर, आयर्लंडने दिले 97 धावांचं टार्गेट
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी इंडिया आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वड्रा यांच्यासह राष्ट्रवादीचे शरद पवार, सुप्रिया सुळे, शिवसेनेचे (उद्धव गट) संजय राऊत, सपा अध्यक्ष अखिलेश यादव, टीएमसी नेते अभिषेक बॅनर्जी, आरजेडीचे तेजस्वी यादव, द्रमुक नेते एम.के. स्टॅलिन, झारखंडचे मुख्यमंत्री चंपाई सोरेन, आप नेते राघव चढ्ढा, सीपीआयचे (एम) नेते सीताराम येचुरी यांच्यासह अनेक नेते उपस्थित आहेत. सुमारे दीड तास या नेत्यांमध्ये चर्चा झाली.
सरकारच्या धोरणांविरोधात जनादेश, बहुमत न मिळणं हा मोदींचा पराभव; खर्गेंचे टीकास्त्र
या बैठकीच्या माध्यमातून मल्लिकार्जुन खर्गे यांनी समविचारी पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.
इंडिया आघाडीने जारी केलेल्या संयुक्त निवेदनात आम्ही भारतीय जनतेचे आभार मानतो. भाजप आणि त्यांच्या द्वेषाच्या, भ्रष्टाचाराच्या राजकारणाला जनतेच्या जनादेशामुळं चोख मिळालं. बहुमत न मिळणं हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा राजकीय आणि नैतिक पराभव आहे, असं म्हटलं.
भारतीय राज्यघटनेचे रक्षणासाठी आणि मोदी सरकारच्या काळातील महागाई, बेरोजगारी आणि भांडवलशाही यांच्या विरोधात हा जनादेश आहे, इंडिया आघाडी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपच्या फॅसिस्ट राजवटीविरुध्द लढत राहिले. भाजपचे सरकार सत्तेवर येऊ नये ही जनतेची इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्ही योग्य वेळी योग्य ती पावले उचलू, असंही या निवेदनात म्हटलं.
जनतेला दिलेली आश्वासने आम्ही पाळू, या मुद्द्यांवर आमचं पूर्णपणे सहमत झालं आहे. इंडिया आघाडी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपच्या फॅसिस्ट राजवटीविरुध्द लढत राहिले. भाजपचे सरकार सत्तेवर येऊ नये ही जनतेची इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्ही योग्य वेळी योग्य ती पावले उचलू, असा सूचक इशाराही खर्गेंनी दिला.
पुरेसं संख्याबळ नाही
कोंगुनाडू मक्कल देसिया काची (KMDK) चे सरचिटणीस ई आर ईश्वरण म्हणाले की, जनादेश इंडिया आघाडीच्या बाजूने आहे. पण परिस्थिती अनुकूल नाही आणि संख्याबळही पुरेसं नाही असं ते म्हणाले.