Lok Sabha Election Results 2024 : देशात आज लोकसभा निवडणूक 2024 साठी मतमोजणी (Lok Sabha Election Results) सुरु असून सकाळपासूनच अनेक धक्कादायक निकाल समोर येत आहे. सध्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात एनडीए 290 जागांवर तर इंडिया आघाडी 235 जागांवर पुढे आहे.
देशात 1 जून रोजी सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी मतदान झाल्यानंतर अनेक एक्झिट पोलमध्ये देशात पुन्हा मोदी सरकार येणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता मात्र आज एक्झिट पोलचे अंदाज चुकीचे ठरले आहे. सध्या समोर आलेल्या कलांनुसार भाजपला महाराष्ट्र, राजस्थान, हरियाणा, उत्तर प्रदेशमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे.
देशात सर्वात जागा असणाऱ्या उत्तर प्रदेशमध्ये भाजपला इंडिया आघाडी पेक्षा कमी जागा मिळत असल्याने भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे. तर राजस्थानमध्ये देखील भाजपला यावेळी 13 जागा मिळणार असल्याची शक्यता आहे. 2019 मध्ये भाजपने राजस्थानमध्ये 25 पैकी 25 जागा जिंकल्या होत्या. 2019 मध्ये भाजपने हरियाणामध्ये 10 पैकी 10 जागा जिंकल्या होत्या मात्र यावेळी हरियाणामध्ये देखील इंडिया आघाडीने भाजपला मोठा धक्का दिला आहे.
अजित पवारांना पुन्हा पक्षात घेणार का? शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं…
तर दुसरीकडे एनडीएसाठी आंध्र प्रदेश आणि ओडीशामधून दिलासादायक बातमी आली आहे. याच दोन राज्यांमध्ये भाजपला 2019 च्या तुलनेत जास्त जागा मिळत आहे. मात्र आता देशात भाजप तिसऱ्यांदा सत्तेत येणार का याकडे आता संपूर्ण जगाचा लक्ष लागून आहे.