Lok Sabha Election : ‘महाविकास आघाडीकडून वंचित बहुजन आघाडीला कोणतेही अल्टिमेटम देण्यात आलेले नाही. अशी कोणतीही चर्चा महाविकास आघाडीतल्या कोणत्याही घटक पक्षाने आमच्याशी केलेली नाही. या सर्व बातम्या खोट्या आणि निराधार आहेत. या बातमीत काहीच तथ्य नाही’, असे स्पष्टीकरण वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी दिले आहे. दरम्यान, आज संध्याकाळी सात वाजेपर्यंत वंचित आघाडीने आपला निर्णय द्यावा अन्यथा महाविकास आघाडीचे जागावाटप ठरलं आहे, अशा बातम्या प्रसारमाध्यमांत आल्या होत्या. या बातम्या खोट्या आणि निराधार आहेत, असे मोकळे यांनी स्पष्ट केले.
Shirur Lok Sabha 2024 : लोकसभेला नाव आढळराव पाटलांचे, पण डाव वळसे पाटलांचा
वंचित बहुजन आघाडी जर सोबत आली नाही तर 22-16-10 असा जागावाटपाचा फॉर्म्युला राहिल. यानुसार ठाकरे गट 22, काँग्रेस 16 आणि शरद पवार गट 10 जागांवर लढतील अशी शक्यता आहे. जर वंचित आघाडी सोबत असे 20-15-9-4 असा फॉर्म्युला राहिल. ठाकरे गट 20, काँग्रेस 15, शरद पवार गट 9 आणि वंचित आघाडी 4 असा फॉर्म्युला राहिले असे ठरल्याचे सांगण्यात आले होते.
पराभूत होणाऱ्या जागा देऊन बोळवण केली जात असल्याचा दावा या नेत्यांनी केला आहे. त्यामुळे आता पुढे काय घडामोडी घडतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. यानंतर मुंबईत राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेत प्रकाश आंबेडकर सहभागी झाले होते. त्यामुळे वंचित आघाडी महाविकास आघाडीत सहभागी होईल अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र, या चर्चा अद्याप प्रत्यक्षात आलेल्या नाहीत. वंचित आघाडी महाविकास आघाडीतील सहभागाची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.
अशा परिस्थितीत जागावाटपाच्या चर्चा सुरू आहेत. मविआ नेत्यांनी निर्णय देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला आज (मंगळवार) संध्याकाळपर्यंतचा वेळ दिल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांत आल्या होत्या. परंतु, या बातम्यात काहीच तथ्य नाही. या बातम्या खोट्या आहेत त्यात काहीच तथ्य नाही, असे वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी स्पष्ट केले.
प्रकाश आंबेडकराचं ‘मविआ’सोबत पक्कं होणार, राहुल गांधींना दिलं जेवणाचं आमंत्रण