JP Gavit Net Worth: दिंडोरीमध्ये महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) भास्कर भगरे यांना उमेदवारी दिली. या जागेसाठी माकप आग्रही होता. मात्र, हा मतदारसंघ माकपच्या वाट्याला न आल्याने माजी आमदार जे.पी.गावित (JP Gavit) यांनी माकप दिंडोरी लोकसभा स्वतंत्रपणे लढणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर आज त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाकडे (Election Commission) प्रतिज्ञापत्र सादर केले. त्या प्रतिज्ञापत्रानुसार, गावित यांच्याकडे कोट्यावधींची संपत्ती आहे.
उमेदवारांपेक्षा जास्त मत NOTA मिळाली तर काय होणार ? निवडणूक आयोगाला सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
प्रतिज्ञापत्रानुसार, गावित यांच्याकडे तब्बस सहा गावात ४७ एकर २५ गुंठे जमीन आहे. यातील काही जमिनी त्यांनी वेळोवेळी खरेदी केल्या आहेत. या सर्व जमिनींची खरेदी किंमत २६.१३ लाख रुपये आहे.
गावित यांच्या संपत्तीत गेल्या पाच वर्षांत फारशी वाढ झाली नाही. त्यांच्या संपत्तीत १३.१२ लाख रुपयांची वाढ झाली आहे. विविध मालमत्ता आणि उत्पन्नाच्या आधारे त्यांची एकूण चल संपत्ती 2 कोटी 36 लाख 40 हजार 800 रुपयांची आहे. तर 2014 मध्ये सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांची मालमत्ता 2 कोटी 22 लाख 28 हजार 892 रुपये इतकी होती.
जनतेची कामं केली असती तर कुटुंबाला प्रचारात उतरवण्याची गरज पडली नसती, चाकणकरांची सुळेंवर टीका
गावित यांच्याकडे 1.07 कोटी रुपयांची अचल संपत्ती आहे. यामध्ये सुरगणा येथे साडेआठ हजार चौरस मीटरचा निवासी भूखंड आहे. अलंगून (सुरगाणा), पंचवटी (नाशिक) आणि अंधेरी (मुंबई) येथे त्यांचे आहेत. गावित यांच्याकडे एक लाख दहा हजार रुपये किमतीचे सोने व इतर दागिने आहेत. त्यांच्याकडे पाच लाख रुपये रोख आहेत. त्यांच्या मालमत्तेत एक इनोव्हा कार आणि स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर आहे.
दरम्यान, दिंडोरीमध्ये महायुतीकडून भारती पवार, राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) भास्कर मगरे, आणि आणि माकपचे जीवा पांडू गावित यांच्यात मुख्य लढत होणार आहे. गावित यांची उमेदवारी मागे घेण्यासाठी महाविकास आघाडीकडून प्रयत्न सुरू होते. मात्र, गावित आपल्या उमेदवारीवर ठाम राहिले. त्यामुळं शरद पवार गटाची डोकेदुखी वाढली आहे.