जनतेची कामं केली असती तर कुटुंबाला प्रचारात उतरवण्याची गरज पडली नसती, चाकणकरांची सुळेंवर टीका
Rupali Chakankar Press Conference : गेली 15 वर्ष कामं केल्यानंतरही तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला जिल्हाभर प्रचार करावा लागत आहे. वृद्ध वडिलांनाही आपला प्रचार करावा लागत आहे. आपल्याला संसदरत्न पुरस्कार मिळाला. त्याची मोठी जाहीरात केली. परंतु, गेल्या पंधरा वर्षात लोकांची काम केली असती तर लोकांनी तुम्हाला डोक्यावर घेतलं असंत. पूर्ण कुटुंबाला प्रचारात उतरावं लागलं नसत, असा टोला चाकणकर (Rupali Chakankar) यांनी नाव न घेता सुप्रिया सुळे यांना लावला आहे. त्या पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
अनेकांना संसदरत्न मात्र शिरूरच्या खासदारांकडून त्याचं भांडवल; आढळरावांची कोल्हेंवर टीका
निवडणुकीनंतर तुम्हाला कळेल
पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपुरच्या घटनेवर बोलले नाहीत. परंतु, आम्ही त्या घटनेचा निषेध नोंदवत आम्ही पंतप्रधानांना पत्र पाठलं होत. आजही त्या घटेनेचा आम्ही निषेध करत आहोत असंही चाकणकर यावेळी म्हणाल्या. तसंच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जास्त काम केलं का शरद पवार यांनी असा प्रश्न विचारला असता चाकणकर म्हणाल्या निवडणुकीनंतर तुम्हाला कळेल. त्यांनी या प्रश्नावर थेट बोलणं चाकणकर यांनी टाळलं.
चाकणकरांनी केल पंतप्रधानांच कौतूक
महिला दिनाच्या दिवशी गॅस सिलेंडरच्या दरात कपात करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम्हाला भेट दिली. आता लोकसभेच्या निवडणुकीत महिलांनी मोठ्या प्रमाणात मतदान केलं तर आपल्याला आणखी भेट मागता येईल असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच कौतूक केलं.
काय मिळालं किंवा काय मिळालं नाही
ज्यावेळी अर्थसंकल्प सादर होतो. त्यावेळी सर्व महिलांच आपल्याला दैनंदिन ज्या गोष्टींची गरज असते त्या गोष्टींकडे महिला लक्ष देतात. त्यामुळे अर्थमंत्री, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आम्ही आभार मानत आहोत असंही चाकणकर यावेळी म्हणाले आहेत. तसंच, घरातील सर्वच गोष्टींवर महिलांच लक्ष असतं. त्यामुळे काय मिळालं किंवा काय मिळालं नाही हे जास्त महिलाचं सांगू शकतात असंही चाकणकर म्हणाल्या आहेत.
तर तशीच मदत आम्ही आत्ताही केली असती पूजा तडस प्रकरणी चाकणकरांचं स्पष्टीकरण
उपाय शोधणं गरजेच
यावेळी चाकरणकर यांनी कायदा सुव्यवस्थेवरही भाष्य केलं. महिला आयोगाचं अध्यक्षपद सांभाळत असताना आमच्याकडे बाहेर घटाना घडल्या हे तर आहेच. परंतु, जन्मदात्या पित्याने मुलीवर बलात्कार केल्याच्या घटना समोर आल्या. परंतु, कठोर शिक्षा झाल्यानंतरही या घटना घडतात. आणि ज्या मुलींवर अत्याचार झाल्यावर तीच्या आयुष्याचं काय असं म्हणत यावर उपाय शोधणं गरजेच असंही चाकणकर यावेळी म्हणाल्या आहेत.