Download App

मविआची चार तासांची बैठक संपली, जितेंद्र आव्हाड म्हणाले, ‘आंबेडकरांकडून आमचा अपेक्षाभंग…’

  • Written By: Last Updated:

Jitendra Awhad : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (LokSabha elections) पार्श्वभूमीवर बैठकांचे सत्र सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. काही काही पक्षांनी त्यांच्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. तरी अद्यापही महायुती आणि महाविकास आघाडी यांचे जागावाटप ठरले नाही. दरम्यान, आज मविआची बैठक झाली. या बैठकीतही तिढा न सुटल्याने प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) नाराज असल्याचं बोलल्या जातं. या बैठकीनंतर आमदार जितेंद्र आव्हा (Jitendra Awhad) यांनी माध्यमांशी संवाद साधला.

बाळासाहेब थोरात यांचा राजकीय वारसदार ठरला, लेकीचं राजकारणात पदार्पण 

आव्हाड म्हणाले, आजच्या बैठकीत फारसे निर्णय झाले नाहीत, असं जरी वंचितकडून सांगण्यात येत असलं तरी बैठक सकारात्मक झाली. शिवसेना, कॉंग्रेस आणि शरद पवार गटाचं जागावाटप जवळपास ठरलं आहे. आता वंचितसाठी किती जागा सोडायच्या? आणि कोणत्या सदस्यांसाठी सोडायच्या? असा प्रस्ताव आम्ही वंचितला मागितला आहे. तो प्रस्ताव प्रकाश आंबेडकर पुढील बैठकीत देणार आहेत. आमचा अपेक्षाभंग होणार नाही ही अपेक्षा आम्हाला आहे, असं आव्हाड म्हणाले.

निवडणुका आल्या की विशिष्ट धर्माला टार्गेट केल जातंय; बच्चू कडूंची राणा दाम्पत्यावर टीकास्त्र

पुढं बोतलांना ते संविधान वाचवण्यासाठी पुढं आलं पाहिजे, ही आमची आणि आंबेडकरांची भूमिका आहे. दोघांचा ध्येय एक आहे, आमचा शत्रू कॉमन आहे. त्यामुळं आंबेडकर यांना बाजूला करून निवडणूक लढवू नये, अशी मविआची भुमिका असल्याचं आव्हाड म्हणाले.

पवारांचं 60% आयुष्य विरोधी पक्षातच
निवडणुका झाल्यावर मविआतील कोणताही घटकपक्ष भाजपसोबत जाणार नाही, असा प्रस्ताव आंबेडकरांनी मविआला दिल्याचं बोलल्या जातं. त्याविषयी आव्हाडांना विचारलं असता ते म्हणाले की, जेव्हा 2014 ला राष्ट्रवादीची बैठक झाली, तेव्हाच आमच्यातले काही लोक सांगत होते की भाजपासोबत जाऊया. मात्र, माझ्यासारख्यांनी तेव्हा विरोध केला. सत्ता नाही म्हटल्यावर तुम्ही शऱद पवारांचा वैचारिक लिलाव करताय का? असा सवाल केला.

पवार हे आयुष्यभर सत्तेत राहिले नाहीत. पवारांचं 60% आयुष्य विरोधी पक्षातच गेलेलं आहे. त्यांच्यावर भाजपात जाण्यासाठी स्वकीयांकडूनच दबाव टाकला गेला. अंतिम क्षणाला जेव्हा एका गटाने सांगितलं की, आम्ही भाजपसोबत जाणार, तेव्हा पवार म्हणाले की तुम्ही जा. पवारांचा ज्या घरावर ताबा होता ते घर फुटताना त्यांनी पाहिलं. तरीही जातीयवादी पक्षासोबत मी जाणार नाही हा आपला निर्णय पवारांनी काय कायम ठेवलेला आहे, असं आव्हाड म्हणाले.

दिल्ली महाराष्ट्राला लुटतेय
अल्पसंख्यांक इतर मागासवर्गीय दलित यांच्यासाठी एकत्र आलं पाहिजे. असं जर नाही झालं तर 85% समाज वरवंट्याखाली येईल. शेवटी देश जगला, महाराष्ट्र जगला, तर मी जगेन. आज दिल्ली महाराष्ट्राला लुटून खात आहे, असंही आव्हाड म्हणाले.

ठाकरे कोणालाही भेटलेले नाहीत
आदित्य ठाकरेंनी अमित शाहांची भेट घेतल्याची चर्चा आहे. त्याविषयी विचालले असता आव्हाड म्हणाले की, ठाकरे अजिबात कोणालाही भेटलेले नाहीत, हा त्यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न आहे, असं आव्हाडांनी सांगितलं.

follow us

वेब स्टोरीज