Download App

‘राष्ट्रासाठी राष्ट्रवादी’ : NCP चा जाहीरनामा प्रसिध्द, पक्षाने कुठली आश्वासनं दिली?

  • Written By: Last Updated:

NCP manifesto  : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha election) पार्श्वभूमीवर कॉंग्रेस, भाजप यांनी आपापले जाहीरनामे प्रकाशित केले. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने देखील आज आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) यांनी जाहीरनामा वाचून दाखवला. हा जाहीरनामा राष्ट्रासाठी राष्ट्रवादी या संकल्पनेवर आधारीत असल्याचं ते म्हणाले.

Rajkumar Rao: ‘श्रीकांत’ सारखा चित्रपट करण ही जबाबदारी नाही तर…; अभिनेत्याने केला खुलासा 

मुंबईतील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यालयात आयोजित कार्यक्रमात अजित पवारांनी जाहीरनामा वाचून दाखवला. ते म्हणाले, दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही एक समिती नेमली आहे. त्या समितीने अहोरात्र मेहनत करून जाहीरनामा प्रसिध्द केला. अठरा पगड जातींचा विचार करणार आणि सर्वांगिण विकासाला प्राधान्य देणारा हा जाहीरनामा आहे.

मोठी बातमी : …अन्यथा सलमान खानसारखं प्रकरण करू; जितेंद्र आव्हाडांना बिश्नोई गँगची धमकी 

जाहीरनाम्यातील महत्वाच्या घोषणा
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देणार
यशवंतराव चव्हाणांना भारतरत्न पुरस्कार देणार
शेतकऱ्यांना एमएसपी देण्यासाठी प्रयत्न
अपारंपारिक वीज निर्मिती करणार
शेतकरी पीक विम्याच्या व्याप्तीत वाढ करणार
शेतकरी सन्मान निधीत भरीव वाढ करणार
जातनिहाय जातगणना
उर्दू शाळांना सेमी इंग्लिशचा दर्जा
वक्षेत्रात पाण्याचे साठे तयार व्हावे यासाठी योजना

ग्रामविकासाची पंचसुत्री-
आरोग्य, शिक्षण, स्वस्छात आणि पर्यावरण आणि रोजगार ही राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या ग्रामविकासाची पंचसुत्री असल्याचं अजित पवार म्हणाले.

अजित पवार म्हणाले, पंतप्रधान मोदी म्हणजे एनडीएचा विश्वासू चेहरा आहेत. त्यामुळे मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत मोदींच्या नेतृत्वात निवडणुका लढतोय, त्यामुळं आपला विजय नक्की होणार, असा विश्वास अजित पवारांनी व्यक्त केला.

follow us